शहरातील जम्बो कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करा आमदार चंद्रकांत दादा पाटलाचे आयुक्तांना निवेदन

महापालिकेच्या हेल्पलाईन सेवेबाबत देखील तक्रारी वाढल्या असून ऑपरेटर फोन उचलत नाहीत, त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नाही यांसारख्या तक्रारींचा ओघ वाढत आहे. या सेवेचा नागरिकांना लाभ व्हावा या दृष्टीने त्वरित कार्यवाही करण्यात यावी

    पुणे: शहरात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे बेडची संख्या अपुरी पडू लगली आहे. त्यामुळे अनेक नागरिक हवाल दिल झाले आहेत. त्यामुळे शहरातील जम्बो कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावे तसेच त्याठिकाणी व्हेंटिलेटरची संख्या वाढवावी अशी मागणी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यासाठी चंद्रकांत पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांना याबाबत एक निवेदन दिले आहे. यामध्ये त्यांनी बेड सोबत रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावे असे म्हटले आहे. महापालिकेच्या हेल्पलाईन सेवेबाबत देखील तक्रारी वाढल्या असून ऑपरेटर फोन उचलत नाहीत, त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नाही यांसारख्या तक्रारींचा ओघ वाढत आहे. या सेवेचा नागरिकांना लाभ व्हावा या दृष्टीने त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशीही सूचना केली आहे.

    खासगी रुग्णालयातील किमान ८०टक्के खाटा ह्या कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवाव्यात व त्या ताब्यात घेण्याची कार्यवाही त्वरित सुरु करावी अशीही आग्रही मागणी केली आहे.  विविध व्यक्तीगत कारणाने वा जागे आभावी अनेक रुग्णांना घरी विलगीकरणात राहणे शक्य होत नाही, अश्या रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र तातडीने सुरु करावे. यासह जे रुग्ण घरीच विलगीकरणात राहू शकतात अशांच्या व त्यांच्या नातेवाईकांचे प्रबोधन करून त्यांना रुग्णालयात भरती होण्यापासुन परावृत्त केल्यास अत्यवस्थ व इतर आजार असलेल्या कोरोना रुग्णांसाठी अधिक खाटा उपलब्ध होतील. तरी त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. असे म्हटले आहे.