कबड्डी संघाच्या गाडीचा भीषण अपघात, दोन खेळाडूंचा दुर्दैवी मृत्यू

सकाळी पहाटे तवेरा गाडीतून सगळे स्पर्धेला निघाले होते. यांच राष्ट्रीय खेळाडू महादेव आवटे, सोहेल सय्यद, समीर शेख, अनिकेत सुर्यवंशी, सिद्धार्थ कांबळे, गणेश कोळी, अविष्कार कोळी, संदिप सुर्यवंशी यांच्यासह इतर खेळाडू तवेरा गाडीतून निघाले होते.

    भवानीनगर : कर्नाटकला कब्बडी सामन्यांसाठी चाललेल्या महाराणा कबड्डी संघाच्या गाडीचा विजापुर येथे सकाळी अपघात झाला. या अपघातात सोहेल सय्यद व महादेव आवटे या दोन खेळाडूूंचा जागीच मृत्यू झाला आहे, तसेच दोन खेळाडू गंभीर जखमी आहेत, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    यामुळे संपुर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. महाराणा संघ कर्नाटकमधील बेडगी येथे होणाऱ्या कब्बडी सामन्यांसाठी निघाला होता. या संघात भवानीनगर, कळंब आणि तालुक्यातील इतर गावांतील खेळाडूंचा समावेश होता.

    सकाळी पहाटे तवेरा गाडीतून सगळे स्पर्धेला निघाले होते. यांच राष्ट्रीय खेळाडू महादेव आवटे, सोहेल सय्यद, समीर शेख, अनिकेत सुर्यवंशी, सिद्धार्थ कांबळे, गणेश कोळी, अविष्कार कोळी, संदिप सुर्यवंशी यांच्यासह इतर खेळाडू तवेरा गाडीतून निघाले होते.

    स्पर्धेपासून काही अंतरावर असताना खेळाडू असलेल्या तवेरा गाडी आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सूत्रे हलवून इतर जखमी खेळाडूंना लवकरच उपचार सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न केले. मात्र दोन खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला.