गोपाळ समाजहित महासंघ दौंड तालुका अध्यक्षपदी काजेश पवार यांची निवड

पारगाव : सामाजिक कार्यामध्ये जिकरीने काम करणारे हातवळण ता.दौंड येथील काजेश पवार यांची सर्वानुमते (ता.०१) रोजी गोपाळ समाजहित महासंघ दौंड तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

गोपाळ समाजहित महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील प्रथम महिला सरपंच म्हणून मान मिळवलेल्या हातवळण ता.दौंड येथील हर्षदा पवार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्याध्याक्ष रमेश पवार,मार्गदर्शक दत्तात्रय चौगुले,जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब चौगुले, युवा अध्यक्ष अनिल जाधव हे उपस्थित होते.

संघटन वाढीसाठी जोमाने काम करण्याची इच्छा व एकजुटीने समाजकार्य करू अशी ग्वाही यावेळी नवनियुक्त दौंड तालुका अध्यक्ष काजेश पवार यांनी दिली.भटक्या विमुक्त जमाती मध्ये गणला जाणारा हा गोपाळ समाज सामाजिक प्रवाहात आणण्याचे काम गोपाळ समाजहित महासंघ ही संघटना करत आहे.यावेळी माजी सरपंच रमेश जगताप,नानासाहेब फडकेमाजी संचालक कात्रज दूध संघ,सुनील पवार,अनिल पवार,हनुमंत गव्हाणे,कनिफ चौगुले,मंगेश फडके,प्रदीप गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

“नवनियुक्त सरपंच हर्षदा पवार यांच्या सत्कार समारंभात बोलत असताना समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर राजकीय प्रवाहात येणे गरजेचे आहे ”

-नंदकुमार पवार ,अध्यक्ष