कामधेनू दत्तक ग्राम योजना : शेतक-यांचे परिसंवादातून विविध विषयावर मार्गदर्शन

उपस्थितांशी संवाद साधताना प्रवीण माने यांनी कामधेनू दत्तक ग्राम योजनेतील लाभांविषयीची माहिती ग्रामस्थांना दिली. जनावरांचे संगोपन करताना, रोगराई,आजार टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी या विषयी परिसंवादात मार्गदर्शन करण्यात आले

    इंदापूर : कामधेनू दत्तक ग्राम योजनेतून पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती,जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने उपस्थितीत अगोती नं.१ येथे शेतक-यांसाठी परिसंवाद व औषधे बि-बियाणे वाटप कार्याचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग,पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.

    उपस्थितांशी संवाद साधताना प्रवीण माने यांनी कामधेनू दत्तक ग्राम योजनेतील लाभांविषयीची माहिती ग्रामस्थांना दिली. जनावरांचे संगोपन करताना, रोगराई,आजार टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी या विषयी परिसंवादात मार्गदर्शन करण्यात आले.शेतक-यांना बी-बियाणांचे वाटप करण्यात करण्यात आले.अगोती नं.१ चे सरपंच, उपसरपंच,पशुवैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.