कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत, ठेवीदारांमध्ये उडाली एकच खळबळ

पुणे येथे ठेव विमा महामंडळाच्य प्रतिनिधींची बैठक कराड जनता सहकारी बँकेचे एक लाख ९९ हजार ७६१ ठेवीदार आहेत. त्यांच्या ठेवी ५१६ कोटी ३५ लाख इतक्या आहेत. पैकी ५ लाखांच्या आतील एक लाख ९९ हजार १६३ एवढे ठेवीदार आहेत.

कराड : कराड जनता सहकारी बँक (Karad Janata Sahakari Bank ) दिवाळखोरीत गेल्याने ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पाच लाखांपर्यंत ठेवीला विमा संरक्षण असल्याने त्या परत देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्या अनुषंगाने पुणे सहकार आयुक्तांनी गुरुवार दि. १० डिसेंबर रोजी पुणे येथे ठेव विमा महामंडळाच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली असल्याची माहिती कराडचे उपनिबंधक व कराड जनता बँकेचे अवसायक मनोहर माळी (Manohar Mali) यांनी दिली.

पुणे येथे ठेव विमा महामंडळाच्य प्रतिनिधींची बैठक कराड जनता सहकारी बँकेचे एक लाख ९९ हजार ७६१ ठेवीदार आहेत. त्यांच्या ठेवी ५१६ कोटी ३५ लाख इतक्या आहेत. पैकी ५ लाखांच्या आतील एक लाख ९९ हजार १६३ एवढे ठेवीदार आहेत. या बैठकीत कराड जनता बँकेतील ५ लाखांपर्यंतच्या ठेवीदारांच्या ठेवीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या ठेवीदारांचे विम्याचे प्रस्ताव तयार करण्याबाबत चर्चा होईल.

या ठेवीदारांचे विम्याने हप्ते नियमित आहेत. त्यामुळे या ठेवीदारांना पाच लाखापर्यंतची रक्कम परत मिळेल.
पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण आहे. दरम्यान, पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार असल्याने ठेवीदारांनी आनंद व्यक्त केला आहे. काही ठेवीदारांनी मनोहर माळी यांना फोन करून धन्यवाद दिले आहेत.