rape

शिक्रापूर : करंदी (ता.शिरूर) येथील सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्या गळ्यातील सोन्याची चैन व कानातील दागिने विकून युवतीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलिसांनी आरोपी किरण चव्हाण याचे विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
करंदी (ता. शिरूर) येथील सोळा वर्षीय युवतीची ओळख किरण चव्हाण या युवकासोबत झाली होती. त्यांनतर किरणने युवतीसोबत वारंवार फोनवर बोलून संपर्क वाढविला होता, त्यांनतर किरण याने लग्नाचे अमिष दाखवीत युवतीला चाकण जवळील म्हाळुंगे परिसरात पळवून नेले त्या ठिकाणी त्याने भाड्याने घेतलेल्या खोलीमध्ये युवतीला ठेवून युवतीच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि कानातील सोन्याचे फुले किरण याने सोनाराला विक्री केले. दरम्यानच्या काळामध्ये त्याने युवतीशी बळजबरीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्तापित करून युवतीवर बलात्कार केला, त्यानंतर युवतीला करंदी परिसरात आणून सोडले त्यांनतर युवतीने घरी गेल्यानंतर घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यांनतर युवतीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे जात फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी किरण रोहिदास चव्हाण रा. म्हाळुंगे (ता. खेड) जि. पुणे मूळ रा. अहमदनगर (ता. अहमदनगर) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर व पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.