करंदीचे माळरान होणार हिरवेगार

राजेश्री शिवशाही समूहाचा अनोखा उपक्रम

शिक्रापूर : सध्या सर्वत्र झाडांची संख्या कमी होत असताना तसेच वृक्षारोपण हि काळाची गरज निर्माण होत चाललेली असताना राजेश्री शिवशाही समुहाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत करंदी येथील ओसाड माळरान व डोंगर हिरवेगार करण्याचा निर्धार करत वृक्षारोपण करण्यास सुरवात केली आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश्री शिवशाही समूहाचे अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी सामाजिक भावनेतून कार्य करत एखादे ओसाड माळरान फुलविण्याचा संकल्प करत याबाबत आपल्या सर्व मित्रांना माहिती दिली त्यांनतर सर्वांच्या विचाराने करंदी येथील नप्तेवस्ती येथील डोंगराची वृक्षारोपण करण्यासाठी निवड करण्यात आली, त्यांनतर राजेश्री शिवशाही समूहाचे अध्यक्ष गणेश चव्हाण, गुलाबराजा फुलमाळी, राहुल मावळे, गोपाळ सुतार, मयुरेश गवळी, गौरव पवार, कृणाल वीर, प्रकाश आवारे, हनुमान गिरी, तेजस साळवे, संजय हजारे, स्वप्निल देसले, सौरभ चोपडे, शिरीश डोमाळे, अभिषेक लोखंडे, रंजित इंगळे यांसह आदींनी करंदी येथील नप्तेवस्ती येथील डोंगरावर जात तेथे वड, पिंपळ, बदाम, लिंब यांसह आदी देशी झाडांची लागवड केली आहे, तर येथील डोंगरावर काही अंतरावर झाडांची लागवड करण्यात आली असून प्रत्येक आठवड्यातील रविवारी राजेश्री शिवशाही समूहाचे स्वयंसेवक येथील डोंगरावर श्रमदान करणार असून झाडांना आळे बनविणे, झाडे लावणे, झाडांना पाणी घालणे यांसह आदी कामे करणार असून करंदी येथील डोंगरावर लावलेल्या झाडांच्या देखभालीची जबाबदारी येथील सचिन नप्ते व नितीन दरेकर यांनी घेतली असल्याचे राजेश्री शिवशाही समूहाचे अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी सांगितले आहे. तर या युवकांच्या कार्यामुळे करंदीचा परिसर हिरवागार होण्यास मदत होणार असून राजेश्री शिवशाही समूहाच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.