तलवार बाळगल्याप्रकराणी एकजण कर्जत पोलिसांनी ताब्यात ; भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल

कर्जत : ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने कर्जत तालुक्यात पोलीस गस्त करीत असताना दि.१८रोजी सायंकाळी साडे आठच्या सुमारास बारडगाव-राशीन रस्त्यावर पोलीस पथकाला मागून टाटा सफारी वाहन(एम. एच.१२जीके३७७१) भरधाव वेगाने राशीनच्या दिशेने जाताना दिसली पोलिसांना संशय वाटल्याने त्यांनी धुमकाई फाटा या ठिकाणी सफरी वाहन अडवून गाडीत केवळ वाहनचालक असल्याचे आढळून आले.

या वाहन चालकास त्याचे नांव विचारले असता त्याने आपले नांव उमेश भाऊसाहेब म्हस्के वय-३७वर्ष रा. तळवडी ता. कर्जत असे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यांना बाकावर एक लोखंडी तलवार आढळून आली. पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेऊन कर्जत पोलीस ठाण्यात पोकॉ. गणेश ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस उपधीक्षक अण्णासाहेब जाधव,पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे,पोहेकॉ.तुळसीदास सातपुते,पोकॉ. सचिन वारे यांनी केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.