Crime

कर्जत : राशीन गावातील सावता माळी किराणा स्टेअर्स बंद दुकान दि. २१ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले. दुकानाचे शटर कापून चोरट्यांनी दुकानातील तेलाचे डब्बे साबण , शाम्पू , शेंगदाणे , खोबरे , बल्ब , बिस्कीट , काजु , बदाम वैगरे खादयपदार्थ असे मिळून सुमारे ३ लाख ६ हजार रुपये किंमतीचे किराणा सामान व रोख रक्कम चोरली होती

कर्जत : राशीन गावातील सावता माळी किराणा स्टेअर्स बंद दुकान दि. २१ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले. दुकानाचे शटर कापून चोरट्यांनी दुकानातील तेलाचे डब्बे साबण , शाम्पू , शेंगदाणे , खोबरे , बल्ब , बिस्कीट , काजु , बदाम वैगरे खादयपदार्थ असे मिळून सुमारे ३ लाख ६ हजार रुपये किंमतीचे किराणा सामान व रोख रक्कम चोरली होती.या बाबत कर्जत पोलीस स्टेशन येथे दि. २२ रोजी गुन्हा नोंद झाला होता. मनोज पाटील पोलीस अधिक्षक अहमदनगर , सौरव अग्रवाल अप्पर पोलीस अधिक्षक अहमदनगर , आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस आधिकारी कर्जत यांच्या सूचनेनुसार चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सुरेश माने सहायक पोलीस निरीक्षक , पोलीस अंमलदार अंकुश ढवळे , भाउसाहेब यमगर , श्याम जाधव , गोवर्धन कदम , सुनिल खैरे , वैभव सुपेकर , राशीन दुरक्षेत्राचे भाउसाहेब काळे , सागर मेहत्रे यांनी गुप्त सूत्राच्या माहितीवरुन गुन्हा केलेल्या संशयीत आरोपीवर सतत पाळत ठेवून सदरचा गुन्हा उघडकीस आणला. दुकान फोडणाऱ्या आरोपीपैकी एक आरोपी अक्षय यादव ऊर्फ तारांचद पवार वय १९ वर्ष रा.बारडगाव ता कर्जत यास दि २६ रोजी पोलिसांनी बारडगाव शिवारातून ताब्यात घेउन त्याच्याकडे अधिक तपास केल्यास त्याने गुन्हा कबुल केला. त्यांनतर त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.न्यायालयाने आरोपीस ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.अटकेत असलेला आरोपी अक्षय पवार यांचे विरुदध कर्जत पोलीस स्टेशनला यापुर्वीही बनावट सोने फसवणुक करुन विक्री करणे , घरफोडी , चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत. आरोपीला मदत करणाऱ्या इतर फरार आरोपीचा कर्जत पोलीस शोध घेत आहे.तसेच इतर गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपीची कसुन चौकशी करुन त्याचे विरुदध सुदधा प्रतिबधक कार्यवाही करणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगीतले . दाखल गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे करीत आहेत .