कोरोना रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर कवठे येमाईत १४ दिवस बंद

  • प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांचा आदेश

 कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावात पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून प्रशासन ही अलर्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून दि.५ पासून पुढील १४ दिवस कवठे येमाई गावठाण केंद्रस्थानी धरून ५ किमीचा परिसर बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.        

कोरोना विषाणूचा प्रसार एका संक्रमित रुग्णाकडून अन्य इसमास त्यांच्या संपर्कात आल्याने होतो. सदर रुग्ण हा ११ जणांच्या नजीकच्या संपर्कात व १३ जणांच्या लोरीस्क संपर्कात आला होता. सदर रुग्नाच्या आईच्या दहाव्याच्या कार्यक्रमात त्या रुग्नाच्या नजीकच्या संपर्कांतील व्यक्तींशी गावातील १०० पेक्षा जास्त लोकांचा संपर्क आल्याने अनेक जणांना बाधा होण्याची शक्यता आहे.  कवठे येमाई, ता. शिरुर जि. पुणे येथे कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रंण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक झाले आहे.त्यामुळे प्रांताधिकारी  संतोषकुमार देशमुख यांनी अधिकारात मौजे कवठे येमाई, ता. शिरुर जि. पुणे हे  बफर क्षेत्र म्हणून दि. ०५ ऑगस्ट पासून पुढील १४ दिवसांसाठी घोषित केले आहे. तसेच ७ दिवस गाव पूर्णतः करणेत येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. पुढील ७ दिवस फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील.परंतु सदरच्या क्षेत्रामधील नागरिकांकडून दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर होण्याची शक्यता गृहीत धरून प्रतिबंधित क्षेत्रामधील दुचाकी व चारचाकी वाहनांची हालचाल रोखणे जरुरीचे असल्याने प्रतिबंधित  क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी वापरात येणा-या  वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांच्या वापरावर बंदी येत असल्याचे ही आदेशात म्हटले आहे.  दरम्यान स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने सकाळीच भोंगागाडीद्वारे नागरिकांना याबाबत सूचना देतातच सर्व व्यवसाय,दुकाने बंद करण्यात आली. सरपंच अरुण मुंजाळ, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड, कामगार तलाठी सर्फराज देशमुख,पोलीस पाटील गणेश पवार यांनी गावात कोरोना रुग्ण आढळल्यामुळे नागिरीकांनी योग्यती दक्षता व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषयक जनजागृती करताना गावात ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रके वाटण्यात येत असून पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करताना निदर्शनास आल्यास त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.