अमरावती येथे उच्चशिक्षित कावडकर यांनी केला झाडे लावण्याचा संकल्प

सत्यशोधक पद्धतीने विवाह करून निवासी अंध मुलांना केली मदत अमरावती : अमरावती(खोपडा) फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन पुणेच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे उच्चशिक्षित सत्यशोधिका

सत्यशोधक पद्धतीने विवाह करून निवासी अंध मुलांना केली मदत
अमरावती :
अमरावती(खोपडा) फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन पुणेच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे उच्चशिक्षित सत्यशोधिका सरोजनी उर्फ कांचन गोवर्धन लांडे, खोपडा,अमरावती आणि सत्यशोधक स्वप्नील उर्फ मोहन बाळकृष्ण कावडकर, गणेशपूर,अमरावती यांचा कोणताही गाजावाजा न करता महात्मा जोतीराव फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथात सांगितलेले पद्धतीने व संत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने वधूचे घर अंगणात खोपडा येथे (दि.१८) जून रोजी दु.१२ वाजता कोव्हिडं १९ चे नियमाप्रमाणे सत्यशोधक विवाह संपन्न झाला. यावेळी सत्यशोधक विवाह का करावा तसेच महापुरुषांनी केलेल्या कार्याची व स्त्री पुरुष समानता,मांवताधर्म याची महती प्राचार्य अरविंद सुरोसे यांनी देऊन सर्वांचे प्रबोधन केले. विवाहाचे सुरुवातीला वधु वर यांच्या हस्ते संत व महापुरुषांचे फोटोला हार व फुले अर्पण केली. याप्रसंगी बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राचे वतीने विधिकर्ते म्हणून दिनेश जीचकर यांनी जबाबदारी पार पाडली तर मंगळाष्टकाचे गायन माधुरी लांडे, दिनेश जीचकर व मनोज वानखेडे यानी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ ढोक तर्फे सत्यशोधक विवाह रजिस्टर नोंदणी करून सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र वर्धा आयटीआय कॉलेजचे प्राचार्य अरविंद सुरोसे यांच्या हस्ते वधु वर यांना देण्यात आले.
-सर्वांनी वीज योग्य आणि जपून वापरावी
यावेळी अक्षता म्हणून फुले वापरल्याने न वापरलेले तांदूळ व अधिक चे तांदूळ वाशिम येथील मातोश्री पार्वतीबाई अंध विद्यालय निवासी, करंजा येथील मुलांसाठी महिनाभर पुरेल असे ५० किलो तांदूळ भेट दिले. विवाह प्रसंगी अक्षता म्हणून तांदूळ न वावरल्याने व अधिकचे तांदूळ या शुभदिनी निवासी अंध मुलांना दिले हा आदर्श इतरांनी घेतला तर देशातील लाखो टन तांदूळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी व कोव्हिडं १९ मुळे घरातच सर्व कुटूंब अडकल्याने लाईटचे किती महत्व आहे हे या लॉकडावून काळात सर्वजण अनुभव घेत आहेत. तरी सर्वांनी वीज योग्य आणि जपून वापरावी, असे अवाहन एमएसईबी चे अधिकारी राजू इंगळे यांनी केले.