सेवानोंद पुस्तकातील माहिती अद्ययावत ठेवा; महापालिका उपायुक्ताचे विभागप्रमुखांना आदेश

महापालिकेतील अनेक विभागांकडून सेवा पुस्तकाची दुसरी प्रत कर्मचाऱ्यांना देण्यात येत नाही. दुसरी प्रत उपलब्ध करून दिली तरी ती वेळोवेळी अद्ययावत आणि साक्षांकित करून कर्मचाऱ्यांना देण्यात येत नसल्याचे तसेच सेवा अभिलेख सुस्थितीत ठेवली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती १५ एप्रिल २०२१ पर्यंत प्रशासन विभागात पोहोचेल याची दक्षता घ्यावी.

    पिंपरी: सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानोंद पुस्तकातील दूसरी प्रत देण्याबाबत आणि ती साक्षांकित करण्याची तरतुद आहे. मात्र, पिंपरी – चिंचवड महापालिकेतील अनेक विभागांकडून सेवा पुस्तकाची दुसरी प्रत कर्मचाऱ्यांना देण्यात येत नाही. दुसरी प्रत उपलब्ध करून दिली तरी ती वेळोवेळी साक्षांकित करून दिली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती १५ एप्रिल २०२१ पर्यंत प्रशासन विभागात द्यावी, असे आदेश महापालिका उपायुक्त सुभाष इंगळे यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

    महाराष्ट्र नागरी सेवा नियमाअंतर्गत काही अपवाद वगळता प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात सेवा पुस्तक विनामुल्य दोन प्रतिमध्ये ठेवण्याची तरतुद आहे. तसेच सेवा पुस्तकाची एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या अभिरक्षेत ठेवण्याबाबत आणि त्यामध्ये सर्व नोंदी करून त्या साक्षांकित करण्याची तसेच दूसरी प्रत संबंधित सरकारी कर्मचाऱ्याला देण्याबाबत आणि त्यामध्ये नोंदी घेऊन त्या साक्षांकित करण्याबाबतही तरतुद आहे. त्यानुसार, १५ सप्टेंबर २०१५ रोजी सेवानोंद पुस्तकाची दुसरी प्रत कर्मचाऱ्यांना देण्याबाबत आणि दुसरी प्रत वेळोवेळी अद्ययावत आणि साक्षांकित करून कर्मचाऱ्यांना देण्याबाबत तसेच सेवा अभिलेख सुस्थितीत ठेवण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले होते.

    महापालिकेतील अनेक विभागांकडून सेवा पुस्तकाची दुसरी प्रत कर्मचाऱ्यांना देण्यात येत नाही. दुसरी प्रत उपलब्ध करून दिली तरी ती वेळोवेळी अद्ययावत आणि साक्षांकित करून कर्मचाऱ्यांना देण्यात येत नसल्याचे तसेच सेवा अभिलेख सुस्थितीत ठेवली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती १५ एप्रिल २०२१ पर्यंत प्रशासन विभागात पोहोचेल याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या माहितीमध्ये महापालिका विभागाचे नाव, उपविभागाचे नाव, स्थायी अस्थापनेवरील एवूâण कर्मचारी व सेवानोंद पुस्तक संख्या, सेवानोंद पुस्तकाची दुसरी प्रत ठेवलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या, सेवानोंद पुस्तकाच्या दुसऱ्या प्रतींमधील नोंदी पूर्ण आहेत किंवा नाही आणि सेवानोंद पुस्तकाची दुसरी प्रत न ठेवलेल्या एवूâण कर्मचाऱ्यांची संख्या अशी सर्व नोंद ठेवावी लागणार आहे.