Khed: Message in vulgar language on WhatsApp group of State Talathi, Patwari, Board Officer Coordinating Federation; Demonstration movement from Talathi organization

महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या खेड तालुका शाखेतर्फे सोमवारी (दि. ११) तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय निदर्शन आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी तलाठी संवर्गासाठी असंविधानिक शब्द वापरल्याने झाले.  त्यांची तत्काळ अन्यत्र बदली न झाल्यास बुधवार (दि. १३) पासून सर्व कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा तलाठी संघटनेने दिला आहे.

  राजगुरुनगर : महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या खेड तालुका शाखेतर्फे सोमवारी (दि. ११) तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय निदर्शन आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी तलाठी संवर्गासाठी असंविधानिक शब्द वापरल्याने झाले.  त्यांची तत्काळ अन्यत्र बदली न झाल्यास बुधवार (दि. १३) पासून सर्व कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा तलाठी संघटनेने दिला आहे.

  राजगुरुनगर येथील धरणे आंदोलनात तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष बलभीम पाटील, उपाध्यक्ष दीपिका बच्छाव, चिटणीस बंडू आवटे, जिल्हा प्रतिनिधी दिपक जाधव, पुणे जिल्हा तलाठी व मंडळ अधिकारी सहकारी पतसंस्था उपाध्यक्ष राजाराम सुळ यांच्यासह सर्व तलाठी सहभागी होते. या आंदोलनाला राज्य महसूल संघटनेने पाठिंबा दिल्याचे राजगुरुनगरचे तलाठी बी. के. लंघे व मनीषा राऊत यांनी सांगितले.

  याबाबत सविस्तर माहिती देताना अध्यक्ष पाटील म्हणाले की जगताप यांनी राज्य तलाठी, पटवारी, मंडळाधिकारी समन्वय महासंघाचे राज्य अध्यक्ष ज्ञानदेव डुबल व पुणे जिल्हाध्यक्ष सुधीर तेलंग यांच्याबाबत समन्वयासाठी असलेल्या व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपवर असभ्य भाषेत मेसेज केला. याचे राज्यात महसूल खात्यात तीव्र पडसाद उमटले.

  चिटणीस आवटे म्हणाले की जगताप यांच्या निषेधार्थ दि. ७ ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लावून दैनंदिन कामकाज करण्यात आले. ८ ऑक्टोबर रोजी महसूल विभागाला निवेदन देण्यात आले. दि. ११ ऑक्टोबरला एक दिवसीय निदर्शन आंदोलन करण्यात आले. मंगळवारी (दि. १२) तहसीलदारांकडे डिजिटल सिग्नेचर की जमा करण्यात येणार आहे. परवापर्यंत जगताप यांची अन्यत्र बदली न झाल्यास बुधवारोपासून (दि. १३) कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल.

  याप्रसंगी खेड तालुका तलाठी संघाचे कार्याध्यक्ष विनोद शिंदे, कोषाध्यक्ष विकास नरवडे, संघटक राहुल पाटील, सहचिटणीस मारुती चोरमले, सहकोषाध्यक्षा वैशाली झेंडे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य सुनील धर्माकांबळे, राजेंद्र वडणे, श्याम वाल्हेकर, बाळासाहेब राठोड व सतिश शेळके, सल्लागार श्रीधर आचारी, चंद्रकिशोर भोर, हरिभाऊ सोनवणे यांच्यासह समस्त तलाठी वृंद उपस्थित होता.

  दरम्यान तलाठी संघटनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे गावगाडा कामकाज ठप्प झाले आहे. तसेच परवा होणारी फेरफार अदालत आंदोलनाच्या कचाट्यात सापडली आहे.

  खेडच्या तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी निवेदन स्वीकारले