gang rape in mumbai

नारायणगाव पाेलिसांची कामिगरी : चार जणांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नारायणगाव : नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून फूस लावुन पळवून नेणाऱ्या ४ आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात अाला असल्याची माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली .

पोलिसांनी शुभम प्रकाश गाडेकर (वय २१), प्रकाश विठोबा गाडेकर (वय ५६), रोहिदास विठोबा गाडेकर (वय ५०, सर्व रा. माळवाडी, खोडद, ता. जुन्नर) व प्रविण लक्ष्मण वाघ (वय १८ रा. ओझररोड, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १६ नोव्हेंबरला रात्री साडेबराच्या सुमारास खोडद गडाचीवाडी येथील दोन अल्पवयीन मुली या घरी काहिही न सांगता अचानक निघुन गेल्या होत्या. या मुली अल्पवयीन असल्याने गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी नारायणगाव पोलिसांना पिडीत मुलींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला असता या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलींना शुभम गाडेकर, प्रकाश गाडेकर व रोहिदास गाडेकर यांनी संगणमताने फूस लावून नाशिक येथे पाठवुन दिल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक  डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते यांचच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस हवालदार टाव्हरे, पोलीस नाईक दिनेश साबळे, अतुल भेके, सचिन कोबल, प्रवीण लोहोटे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक राजु मोमीन यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड करीत आहेत.

असा घेतला पोलिसांनी शाेध
या तिघांनी अल्पवयीन मुलींना नाशिक येथे एसटीबसने पाठविले होते. या मुलींचा मोबाईल बंद झाल्या मुळे त्यांचा शोध घेणे अवघड झाले होते. तांत्रिक माहितीवरून या मुली पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे निर्जन ठिकाणी असल्याचे समजताच नारायणगावचे पोलीस हवालदार एस. एम. टाव्हरे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल भेके, पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे यांच्या पथकाने अवघ्या ४८ तासांच्या आत पालघर येथील जंगल परिसरातील दुर्गम भागात जाऊन पिडीत मुलींचा शोध घेतला. या मुलींसह पालघर येथे अल्पवयीन मुलींना फूस लावून बोलावून घेणाऱ्या प्रविण वाघ याला अटक करण्यात आली.