किरीट सोमय्या गुरुवारी बारामतीत परिवहन अधिकारी खरमाटेंच्या मालमत्तेची माहिती घेणार

किरीट सोमय्या यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या बजरंग खरमाटे यांना चांगलेच टार्गेट केले आहे. त्यांच्या संपत्तीबाबत माहिती गोळा करण्यासाठी सोमय्या यांनी नुकतीच सांगली येथे भेट देऊन त्याठिकाणी सर्व माहिती घेतली होती. त्याठिकाणी त्यांनी सेल्फीही काढलेले होते.खरमाटे यांनी बारामती तालुक्यातही काही मालमत्तांची खरेदी केल्याची माहिती किरीट सोमय्या यांच्यापर्यंत पोहोचलेली असून त्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी ते गुरुवारी बारामतीत येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली.

    बारामती :  भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या बारामत मधील संपत्तीची माहिती घेण्यासाठी गुरुवारी (दि ९) बारामतीत येत आहेत. सोमय्या यांच्या या दौऱ्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

    किरीट सोमय्या यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या बजरंग खरमाटे यांना चांगलेच टार्गेट केले आहे. त्यांच्या संपत्तीबाबत माहिती गोळा करण्यासाठी सोमय्या यांनी नुकतीच सांगली येथे भेट देऊन त्याठिकाणी सर्व माहिती घेतली होती. त्याठिकाणी त्यांनी सेल्फीही काढलेले होते.खरमाटे यांनी बारामती तालुक्यातही काही मालमत्तांची खरेदी केल्याची माहिती किरीट सोमय्या यांच्यापर्यंत पोहोचलेली असून त्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी ते गुरुवारी बारामतीत येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली. सोमय्या यांच्या सोबत आमदार गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे हे देखील येणार आहेत.गेल्या अनेक दिवसांनंतर सोमय्या बारामतीत येणार असून त्यांचा हा दौरा लक्षवेधी ठरणार आहे.

    परिवहन मंत्री अनिल परब व बजरंग खरमाटे यांच्यावर सोमय्या यांनी सध्या संपूर्ण लक्ष केंद्रीत केलेले असून येत्या काही दिवसात आणखी काही नेते ईडीच्या रडारवर येणार असल्याचे जाहीर करुन त्यांनी अगोदरच खळबळ उडवून दिलेली आहे.

    बारामती परिसरात अनेक ‌अधिका-यांच्या मालमत्ता
    बारामती शहराच्या परिसरामध्ये अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या मालमत्ता असल्याची चर्चा आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यासह इतर भागात कार्यरत असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता आहेत. यामध्ये काहीजण सेवानिवृत्त झाले आहेत. तर काही जण सध्या सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे या मालमत्तांची देखील चौकशी व्हावी, अशी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे.