किसान सन्मान निधी योजना : दोन कोटी रक्कम होणार वसूल ; नोटीस काढल्याने सुरू झाला भरणा

अकलूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्प भूधारक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत तीन महिन्याला २००० रुपये थेट खात्यात जमा करण्याची योजना सुरु केली. त्यावेळी शासनाने आयकर भरणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेत सहभागी होता येणार नाही, असे स्पष्ट केले होते.

अकलूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्प भूधारक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत तीन महिन्याला २००० रुपये थेट खात्यात जमा करण्याची योजना सुरु केली. त्यावेळी शासनाने आयकर भरणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेत सहभागी होता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. तरीही माळशिरस तालुक्यातील दोन हजार आठरा लोकांच्या खात्यावर जमा झालेली २ कोटी ३ लाख ५२ हजार इतकी रक्कम परत मिळावी, म्हणून तलाठ्या मार्फत नोटीस काढली असून लोक भरणा करू लागले आहेत. १/१२/२०२० पर्यंत ४१ लाख रुपय वसूल झाले आहेत. हे पैसे ताबडतोब भरण्यासाठी सरकारी पातळीवर पर्यंत सुरु आहेत. सरकारला फसविल्यापब्दल कोणतीही कारवाई करण्यात अाली नाही. परंतु केंद्र सरकारचे पैसे असल्याने केंद्राने वेगळा काही निर्णय घेऊन कारवाई करण्याअगोदर ज्यांना नोटीस मिळाली त्यांनी पैसे भरावे, असे तलाठी सांगत आहेत. आता ऑनलाइन व्यवस्था असलल्याने कोणीही शासनाला फसवू शकत नाही. अल्पभूधारक शेतकऱ्याला िदल्या जाणाऱ्या मदतीचा सुशिक्षित माणसे लाभ घेत असल्याचे समाेर अाले अाहे. अजूनही काही पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळताना दिसत नाही.