कोळवाडी-कोटमदरा वनक्षेत्रात वनवा पेटविणा-यावर गुन्हा दाखल

                                                                                        

                                                                                                                                                                                                                   भिमाशंकर : कोटमदरा (ता. आंबेगाव) येथील दत्तात्रय कोकणे यांनी वनक्षेत्रात वनवा पेटवला म्हणून त्यास वनविभागाचे कर्मचा-यांनी अटक केली असल्याचे वनक्षेत्रपाल योगेश महाजन यांनी सांगितले. 

कोळवाडी/कोटमदरा मधिल वनविभागाच्या हद्दीत दि. ८ रोजी दुपारी चारच्या सुमारास दत्तात्रय मु-हाजी कोकणे यांने जंगल पेटविण्याच्या उद्देशाने आग लावली. त्यामुळे वनक्षेत्रातील झाडे व छोटया जिवजंतूंचे मोठे नुकसान झाले. सदर व्यक्तिला आग लावताना वनपाल एस.एस. भुतेकर यांन पकडले. उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपिरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी चौकशी करून सदर व्यक्तिवर वन भारतीय अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कारवाई वनपाल एस. एस. भुतेकर करत आहे. 

दरवर्षी वनवा पेटवल्याने मोठया प्रमाणात झाडे, छोटे मोठे जीव यांचे नुकसान होते. तसेच वनविभागाने लावलेली झाडे देखिल यामध्ये जळून जातात. यासाठी वनवा पेटवणा-यांवर जुन्नर वनविभागाने कडक कारवाई करण्याचा बडगा उचलला आहे. यामध्ये वनवे पेटवणा-यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच वनवा पेटल्या बरोबर वनविभगाचे कर्मचारी व स्थानिक वनसंरक्षक समिती तातडीने हा वनवा विझवतात. परंतु वनवा पेटवणारा सापडत नव्हता. भविष्यात कोणी वनवा पेटवताना आढळल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल तसेच वनवा पेटवताना कोणी दिसल्यास वनविभागाचे कार्यालय किंवा कर्मचा-यांशी संपर्क साधा त्याचे नाव गोपनिय ठेवले जाईल, असे आवाहन वनक्षेत्रपाल योगेश महाजन यांनी केले आहे.