कोरोनापेक्षाही भयानक संकट कोथरूडकरांनी अनुभवले;  सोशल मीडियावर  मिम्सचा गव’गवा’

कोथरूडमध्ये रानगवा आढळ्याचे समजताच सोशल मीडियातील नेटकऱ्यांचा 'सेन्स ऑफ ह्युमर' रानगव्याच्या  वेगाने धावू लागला. अन सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडू लागला

पुणे: कोथरुडमधील महात्मा सोसायटीमध्ये सकाळी रानगवा आढळून आल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली होती. कोथरूडमध्ये रानगवा आढळ्याचे समजताच सोशल मीडियातील नेटकऱ्यांचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ रानगव्याच्या  वेगाने धावू लागला. अन सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडू लागला. अनेक नेटकऱ्यांनी रानगव्याचा संबंध थेट कोथरूडच्या आमदार चंद्रकात पाटील यांच्याशी जोडत मीम्स बनवले.


नेटकऱ्यांने कोथरूडमधील आमदार चंद्रकांत पाटील मूळचे कोल्हापूरचे असल्याने अनेकांनी दाजीपूर अभयारण्यातील रानगवा चंद्रकांत पाटलांना शोधत कोथरुडात आल्याचे म्हटले आहे.

 

काही नेटकऱ्यांनी खोचक टीका करत चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता बाहेरून रानगवा कोथरुडात आल्याचे म्हटले आहे.

एका नेटकाऱ्याने तर स्पेनमधील रनिंग ऑफ द बुल्सचा अनुभव आज कोथरूड करांनी घेतला असल्याचे म्हणता पौड रस्त्यावर गव्याला पकडण्यासाठी धावत असलेल्या नागरिक व पोलिसांचा व्हिडीओ ट्विट केला आहे.