विश्वराज हॉस्पिटलमध्ये कोवीड हेल्थ सेंटर सुरू

लोणी काळभोर: पूर्व हवेली तालुक्यात कदम वाकवस्ती येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये कोवीड-१९ साठी कोरोना संशयित व कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी कोवीड हेल्थ सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने

लोणी काळभोर: पूर्व हवेली तालुक्यात कदम वाकवस्ती येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये कोवीड-१९ साठी कोरोना संशयित व कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी कोवीड हेल्थ सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पुणे जिल्हा आरोग्य विभाग व पंचायत समिती हवेली अधिकाऱ्यांकडून विश्वराज हॉस्पिटलची पाहणी करण्यात आली आहे. लवकरच कोवीड हेल्थ सेंटर सुरू करण्यात येईल, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात यांनी दिली.

-तपासणीचा अहवाल २४ तासाच्या आत प्राप्त होणार

फुरसुंगी,कदमवाक वस्ती,लोणी काळभोर,कुंजीरवाडी,सोरतापवाडी,थेऊर,उरुळी कांचन परिसरातील रुग्णांवर तेथे उपचार करण्यात येणार आहेत. कोविड केअर सेंटरच्या ओपीडीत तीन शिफ्ट असणार असून, यामध्ये तज्ज्ञ डॉक्‍टरच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत. कोरोनाची लक्षणं असलेल्या रुग्णाच्या स्वॅबचे नमुने याठिकाणी घेण्यात येणार असून, पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील. तसेच या तपासणीचा अहवाल २४ तासाच्या आत प्राप्त होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हे सेंटर सध्या २० बेड्सचे असणार आहे. यावेळी पंचायत समिती हवेलीचे उपसभापती सन्नी काळभोर ,जिल्हा परिषद सदस्या अर्चना कामठे,पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर,सरपंच गौरी गायकवाड,अश्विनी गायकवाड,गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के,तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात, मंडळ अधिकारी गौरी तेलंग,आरोग्य अधिकारी दगडू जाधव,तलाठी दादासाहेब झांझे उपस्थित होते.