मांढरे व करंजे यांना कोविड समाजरक्षक पुरस्कार

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आबाराजे मांढरे तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष मयूर करंजे यांनी कोविड १९ या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव काळामध्ये सामाजिक भावनेतून समाजासाठी

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आबाराजे मांढरे तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष मयूर करंजे यांनी कोविड १९ या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव काळामध्ये सामाजिक भावनेतून समाजासाठी केलेल्या विविध सामाजिक कार्यांची दखल घेत आबाराजे मांढरे व मयूर करंजे यांना कोविड १९ समाजरक्षक २०२० हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तसेच बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष मयूर करंजे यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये सामाजिक बांधिलकीतून गरजू लोकांना अन्नधान्य व जेवण वाटप, परप्रांतीयांना जाण्यासाठी वाहनांची सोय करून नागरिकांना मदतीचा हात दिला होता. कोरोना काळामध्ये झटणाऱ्या आरोग्य सेविकांचा देखील सन्मान केला होता. या कार्याची दखल घेत आबाराजे मांढरे व मयूर करंजे यांना अविष्कार सोशल आणि एज्युकेशन फौंडेशन महाराष्ट्रच्या वतीने जिल्हास्तरीय कोविड १९ समाजरक्षक २०२० हा विशेष पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.