सविता सातव यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक वुमन पुरस्कार’ ; दैनिक ‘नवराष्ट्र’च्यावतीने २०२१चा वुमन ॲवॉर्ड वितरण समारंभ

दैनिक 'नवराष्ट्र-नवभारत' वृत्तपत्र समुहाने वुमन आवार्ड पुरस्कार २०२१ देण्यात आले ,महिलांचा समाजात केलेल्या विविध कार्याचा सन्मान आहे. आज मला दैनिक 'नवराष्ट्र' कडून मोठा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक वुमन पुरस्कार देण्यात आला , माझ्यासाठी आनंदी बाब आहे.

    हडपसर : हडपसर सातवनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या ॲड गेणूजी सातव फाउंडेशनच्या अध्यक्षा सविताताई संजय सातव यांना दैनिक ‘नवभारत-नवराष्ट्र’ वृत्तसमुहाचा २०२१ चा वुमन ॲवॉर्ड ‘ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक पुरस्कार भाजप पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील,काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,शिवसेनेच्या विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांच्या हस्ते देण्यात आला.

    बाणेर येथील रामडा हाॅटेल मध्ये दैनिक ‘नवभारत-नवराष्ट्र’ वृत्तसमुहाच्या वतीने वुमन आवार्ड पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभा उपसभापती निलम गो-हे,भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, उद्योजक कृष्णकुमार गोयल,उद्योजिका सुनंदा न्हावले, दैनिक ‘नवभारत-नवराष्ट्र’ चे संचालक मिश्रा,पुणे नवराष्ट्र वृत्तपत्राचे सर व्यवस्थापक राजेश वरळेकर, घनवट सर,आरती मुने विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, वुमन आवार्ड पुरस्कार विजेत्या आदी उपस्थित होते.

    यावेळी पुरस्कर्त्या सविता सातव म्हणाल्या की, दैनिक ‘नवराष्ट्र-नवभारत’ वृत्तपत्र समुहाने वुमन आवार्ड पुरस्कार २०२१ देण्यात आले ,महिलांचा समाजात केलेल्या विविध कार्याचा सन्मान आहे. आज मला दैनिक ‘नवराष्ट्र’ कडून मोठा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक वुमन पुरस्कार देण्यात आला , माझ्यासाठी आनंदी बाब आहे. मी दैनिक ‘नवराष्ट्र’ चे आभार मानावे तेवढे कमीच आहे. मी या सन्मानाने खूप आनंदी आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.