कुसेगाव विकासकामांनी स्मार्टव्हिलेज बनविणार : सरपंच छाया शितोळे

  पाटस : पुणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात श्री. भानोबा देव आणि दानव युध्द प्रसिध्द असलेले गाव म्हणजे दौंड तालुक्यातील डोंगरच्या खुशीत आणि नैसर्गिक सौंदयाने नटलेले गाव कुसेगाव. या गावाला विकास कामांनी नटवून जिल्ह्यात स्मार्ट बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मनाेदय सरपंच छाया शितोळे यांनी व्यक्त केला.

  गावात अशी केली विकासकामे

  सरपंच शितोळे म्हणाल्या, सरपंचपद स्वीकारल्यानंतर सर्व सदस्यांना विश्वासघात घेत हायमास्ट विद्युत दिवे बसवून चव्हाणवस्ती अंधारमुक्त केली. हिंदू मुस्लिम समाजाचा एकोपा असलेल्या पीर दर्गा परिसरात विद्युतीकरण करून सुशोभीकरण केले. गावातून गेलेल्या अष्टविनायक मार्ग रस्त्याच्या दुतर्फा पाटस रोडच्या बाजूने नैसर्गिक सौंदर्यात भर पडण्यासाठी स्वखर्चाने विविध प्रकारची वृक्ष लागवड केली. सार्वजनिक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था केली.
  सुपा ते कुसेगाव हद्दीतील मयुरेश्वर अभयारण्य वगळता अपूर्ण रस्त्यांची कामे मार्गी लावली. पंधराव्या वित्त आयोगातून स्मशानभूमीचे सुशोभीकरण केले. ५० हजार निधी उपलब्ध करून शेड व चौथारा दुरुस्तीचे काम स्वखर्चाने केले आहे.लाेकसहभागातून रुग्णांवर उपचार

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे काटेकोर पालन करीत प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी गावामध्ये सातत्याने निर्जंतुकीकरण केले. सर्वांच्या सहमतीने सातदिवसाचा दोन मिनी लोकडाउन पाळून कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न केला. आशा वर्कर व अंगणवाडी शिक्षिका, शिक्षक , ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यामार्फत कोरोनाचे सर्वेक्षण केले. ४५ र्षापुढील सुमारे पाचशे ग्रामस्थांना कोवीड लस दिली. लोकसहभागातून रूग्णांना औषधाेपचार व आर्थिक मदतीचा हातभार लावला. कोरोना रुग्णांची संख्या ५३ वरून फक्त सहावर आली आहे. योग्य नियोजन, शासकीय नियमांचे काटेकोर पालन करीत गाव कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहे, असे त्या म्हणाल्या.

  महत्वपूर्ण कामे मार्गी लावणार

  पंधराव्या वित्त आयोगामधून गावामधील पाटस ते सुपा रोड व पडवी रोडच्या कडेने ३० विद्युत खांबाचे काम सुरू आहे. पुढील काळात नवीन प्रशस्त ग्रामसचिवालय बांधणे, गावाच्या परिसरात माळारण, भानोबा मंदीर परिसर गायरान मधील १७ एकर जागेत व विविध ठिकाणी वृक्षारोपण करणे, दलित वस्ती, पाटील वस्ती, सर्व वाड्या-वस्त्यांवर हायमास्ट विद्युत दिवे लावणे, पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ओढ्याची दुरुस्ती करून त्याचे खोलीकरण करणे, ज्येष्ठांसाठी विरंगुळा पार्क उभारणे अशी कामे करण्यात येणार अाहेत, असे सरपंच िशताेळे यांनी सांिगतले.

  सरपंचपदाची सूत्रे हाती घेताच अवघ्या पाच महिन्याच्या कालवधीतच अनेक विकास कामे मार्गी लावली. गावासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून वाड्या-वस्त्यांवरील रस्त्यांची कामे मार्गी लावणार आहे.  महिलांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून लघु उद्योग चालू करण्याचे नियोजन आहे. भुयारी गटार, शुध्द पाणीपुरवठा करणे, अंगणवाडी, परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती व सुशोभिकरणाची कामे करण्यात येतील.

  – छाया शितोळे, सरपंच