आंबेगाव तालुक्यातील परप्रांतीय मजूर टप्प्याटप्प्याने मूळ गावी रवाना

भिमाशंकर : टाळेबंदीत गेल्या दीड महिन्यांपासून आंबेगाव तालुक्यात अडकून पडलेले परप्रांतीय कामगार एसटी गाडय़ांमधून मूळ गावी रवाना झाले.कामगारांना मूळगावी पाठविण्यासाठी आंबेगाव तहसिल कार्यालय आणि

भिमाशंकर : टाळेबंदीत गेल्या दीड महिन्यांपासून आंबेगाव तालुक्यात अडकून पडलेले  परप्रांतीय कामगार एसटी गाडय़ांमधून मूळ गावी रवाना झाले.कामगारांना मूळगावी पाठविण्यासाठी आंबेगाव तहसिल कार्यालय आणि पोलीस यंत्रेणेकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. परप्रातीयांनां टप्पटप्प्याने मूळ गावी पाठविण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगावच्या तहसिलदार रमा जोशी व शासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणांच्या हालचालींना वेग आला आहे.    

आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्ताने किंवा अन्य काही कारणास्तव आलेले परप्रांतीय लोकांना एसटीने आपल्या घरी पाठविण्याची सुरुवात झाली आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश मध्ये जाणा-या लोकांना एसटी महामंडळाच्या बसने मंचर व घोडेगाव येथून रवाना करण्यात आले. आंबेगाव तहसिलदार रमा जोशी, नायब तहसिलदार अनंता गवारी, लतादेवी वाजे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव, वैदयकिय अधिक्षक डॉ. प्रताप चिंचोलीकर, डॉ. चंदाराणी पाटील, मंडलाधिकारी योगेश पाडळे, सुनिल नंदकर, तलाठी दिपक हरण, संजय गायकवाड, दिपक करडुले, माने आदि अन्य कर्मचारी यांनी छत्तीसगड, मध्यप्रदेश मध्ये जाणा-या जवळपास ५५९ लोकंाना एसटी महामंडळाच्या बसने एकत्र करून त्यांना त्यांच्या गावी बसने पाठवून दिले.

एसटी बसच्या प्रत्येक सीटवर एक असे फक्त बावीस लोक यावेळी प्रवास करत आहे. छत्तीसगडला जाण्यासाठी ६ गाडयांमध्ये १३७  प्रवासी, मध्यप्रदेशला जाण्यासाठी १६ गाडयांमध्ये ४२२ लोकांना रवाना करण्यात आले. तर महाराष्ट्राच्या यवतमाळ, लातूर आदि विविध जिल्हयात जाण्यासाठी ३१२ प्रवाशांना ११ एसटीबसच्या सहायाने त्यांच्या इच्छित स्थळी पोहचविण्यात आले. संबंधित लोकांना रवाना करताना त्यांचे थर्मल स्क्रीनिंग तसेच प्राथमिक तपासणी करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क वापरणे, सॅनिटायझर आदि बाबींचा अवलंब करण्यात आला. 

सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार रमा जोशी, संपुर्ण तालुका महसुल प्रशासनाने विशेष नियोजन करून अडकुन पडलेल्या कामगार व मजुरांना महाराष्ट्राच्या विविध जिल्हयात व परप्रांतियांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी चांगले नियोजन केले.