चाकण मधील दोन कंपन्यातून पावणेपाच लाखाचा ऐवज लंपास

फिर्यादी घनवट यांनी भांबोली टप्पा क्रमांक दोन येथील गौरव प्रेसिंग कंपनीत फॅब्रिकेशन शेड तयार करण्यासाठी लोखंडी साहित्य ठेवले होते.  सकाळी नऊ वाजता कंपनीमधून प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून १ लाख ८४ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याचा प्रकार समोर आला.

    पिंपरी: चाकण औद्योगिक परिसरातील खराबवाडी आणि भांबोली येथील दोन कंपन्यांमधून चोरट्यांनी ४ लाख ७९ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    पहिल्या प्रकरणात अमोल मधुकर नितनवरे (वय ३४, रा. वडगाव घेनंद, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी नितनवरे यांचे खराबवाडी येथे रेडीएंट कन्सल्टन्सी या नावाने वेअर हाऊस आहे. त्यावेअर हाऊसमध्ये युकुल फ्युल सिस्टम या कंपनीचे पल्सर दुचाकीचे कार्बोरेटर स्टोअर करून ठेवण्यात आले होते. १३ मार्च ते १५ मार्च या कालावधीत चोरट्यांनी वेअर हाऊसच्या बाजूचे गज कापून शेडमधील २ लाख ९५ हजार रुपयांचे कार्बोरेटर चोरून नेले.

    दुसऱ्या प्रकरणात माणिक शिवाजी घनवट (वय ५३, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी घनवट यांनी भांबोली टप्पा क्रमांक दोन येथील गौरव प्रेसिंग कंपनीत फॅब्रिकेशन शेड तयार करण्यासाठी लोखंडी साहित्य ठेवले होते.  सकाळी नऊ वाजता कंपनीमधून प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून १ लाख ८४ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याचा प्रकार समोर आला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करत आहेत.