भूकरमापक कर्मचाऱ्याला ५ हजार रुपयांची लाच घेताना अटक

प्रशांत हे भूमी अभिलेख कार्यालय शिरूर येथे भूकरमापक अधिकारी आहेत. यातील तक्रारदार यांनी त्यांच्या जमीन मोजणीचा अर्ज केला आहे. त्यावेळी लोकसेवक प्रशांत यांनी जमिमीची मोजणीकरून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

    पुणे : शिरूर तालुक्यातील भूकरमापक कर्मचाऱ्याला ५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. आज ही कारवाई करण्यात आली आहे.प्रशांत मोहन कांबळे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    प्रशांत हे भूमी अभिलेख कार्यालय शिरूर येथे भूकरमापक अधिकारी आहेत. यातील तक्रारदार यांनी त्यांच्या जमीन मोजणीचा अर्ज केला आहे. त्यावेळी लोकसेवक प्रशांत यांनी जमिमीची मोजणीकरून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागीतली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा कारवाई करत ५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे.