पुण्यात तब्बल दोनशे कोटींचा जमीन घोटाळा; बनावट आदेशावर चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रालयातील अधिकाऱ्याचीही सही

वन विभागाचे राहुल पाटील यांना शंका आल्याने त्यांनी ही 18 एकर जमीन राखीव वन असून, महसूलमंत्र्यांनी यबाबत आदेश दिले का, याबाबत तपासणी करण्याची मागणी केली. त्यानुसार कोलते यांनी थेट मंत्रालयात जाऊन चौकशी केली असता, महसूल मंत्र्यांनी संबंधित व्यक्‍तीचा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट आदेश दिल्याचे निदर्शनास आले.याच वेळी खबरदारी घेत दुय्यम निबंधकांना अशा सातबार्‍यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नये, असे स्पष्ट आदेश दिले.

    पुणे : हडपसर येथील महाराष्ट्र शासनाच्या नावावरील वनविभागाची 200 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली तब्बल 18 एकर जागा थेट खासगी व्यक्‍तीच्या नावे करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 2018 मध्ये तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांच्या नावे बनावट आदेशाद्वारे हा व्यवहार झाल्याचे समजते.

    एका गुंठ्याला कोट्यवधी रुपयांचा भाव असलेल्या मौजे हडपसर येथील स. नं. 62 मधील तब्बल 7 हेक्टर 68 आर, म्हणजे 18 एकर जमीन पोपट पांडुरंग शितकल याने चक्‍क तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच नावाने खोटा आदेश करून हवेली तहसीलदारांना सादर केला.

    या आदेशावर केवळ मंत्रीच नाही, तर मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्याची सही, खरी नक्‍कल अशी सर्व खोटी कागदपत्रे सादर केली. संबंधित कागदपत्रांच्या आधारे नोंद घालण्याचे आदेश देण्यात आलेत. यामध्ये तलाठी व सर्कल यांनी तत्परता दाखवत नोंद मंजूर केली. तथापि, याबाबत संशय आल्याने कोलते यांनी तपासणी सुरू केली आणि यामध्ये वस्तुस्थिती समोर आली.

    दरम्यान, वन विभागाचे राहुल पाटील यांना शंका आल्याने त्यांनी ही 18 एकर जमीन राखीव वन असून, महसूलमंत्र्यांनी यबाबत आदेश दिले का, याबाबत तपासणी करण्याची मागणी केली. त्यानुसार कोलते यांनी थेट मंत्रालयात जाऊन चौकशी केली असता, महसूल मंत्र्यांनी संबंधित व्यक्‍तीचा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट आदेश दिल्याचे निदर्शनास आले.याच वेळी खबरदारी घेत दुय्यम निबंधकांना अशा सातबार्‍यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नये, असे स्पष्ट आदेश दिले.

    हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी तातडीने ही नोंद रद्द करून ही 18 एकर जमीन पुन्हा शासनाच्या नावे केली आहे. खोटी कागदपत्रे दाखल करणाऱ्याविरोधात तहसीलदारांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]