Landlords do not get tenants due to work from home

अनेक कंपन्यांनी वर्कफ्रॉम होमची सुविधा दिल्यामुळे कर्मचारी घरूनच काम करत असल्याने घरमालकांना भाडेकरू मिळणे अशक्य झाले आहे. मागील ९ महिन्यापासून वर्क फ्रॉम असल्यामुळे भाडेकरूंच्या आधाराने चालणाऱ्या इतर छोट्यामोठ्या उद्योगांनाही फटका बसत आहे.

पिंपरी: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊननंतर अनेक कंपन्यानी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची(work from Home) सुविधा दिली आहे. याचा फटका शहरातील घरमालकांना बसत आहे. पिंपरी चिंचवड(pimpri-chinchawad) आयटी (IT )उद्योगाचे मोठे नेटवर्क आहे. देशाच्या विविध भागातून अनेक लोक इथे काम करण्यासाठी येत असतात. परंतु लॉकडाऊनमध्ये भाडेतत्त्वावर घर घेऊन राहणारे कर्मचारी घर खाली करून आपल्या गावी परत गेले आहे.

अनेक कंपन्यांनी वर्कफ्रॉम होमची सुविधा दिल्यामुळे कर्मचारी घरूनच काम करत असल्याने घरमालकांना भाडेकरू मिळणे अशक्य झाले आहे. मागील ९ महिन्यापासून वर्क फ्रॉम असल्यामुळे भाडेकरूंच्या आधाराने चालणाऱ्या इतर छोट्यामोठ्या उद्योगांनाही फटका बसत आहे. कोरोनापूर्वी या भागात भाड्याने घर मिळणे अश्यक्य तसेच भाडेही खूप होते. परंतु आता मात्र या परिसरात अत्यंत कमी भाडयामध्ये घरे उपलब्ध आहेत मात्र भाडेकरू मिळत नाहीत.

हिंजवडी भागात अनेकांनी उत्पन्न मिळावे म्हणून फ्लॅट भाड्याने देणे, हॉस्टेल, रूम भाड्याने देणे आदी व्यवसाय कर्ज काढून सुरू केले आहेत. परंतु सध्या भाडेकरू नसल्याने या लोकांचे उत्पन्न थांबले आहे. सर्वच नामांकित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी आवश्यक लागणारे साहित्य दिले आहेत. पुढील काही दिवस वर्क फ्रॉम होम सुरूच राहणार अशी शक्यता आहे. अश्या स्थिती आर्थिक दरी कशी भरून काढायची असा मोठा प्रश्न घर मालकांना पडला आहे.