Crime

भोर : पुणे सातारा महामार्गावर शिवरे गावच्या हद्दीत एका हॉटेलसमोर थांबलेल्या खाजगी प्रवासी बसमधून लँपटॉप, मोबाईल, रोख रक्कम पांच हजार असलेली बँग अज्ञात चोरटयाने मंगळवारी पाहाटे पळवून नेली आहे. त्यामध्ये तीस हजार रूपयांच्या वस्तू चोरीस गेल्या. याप्रकरणी सर्व्हेश संजय साळगांवकर (वय-२३)रा.कांदिवली मुंबई याने राजगड पोलीसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार सर्व्हेश हा कांदीवलीवरून सिंधुदुर्ग येथे अभ्यासाकरीता सोमवारी निघाला होता. पहाटे नाष्टयासाठी बस थांबली असता ही चोरी झाली. पोलीस निरीक्षक विनायक वेताळ पुढील तपास करीत आहेत.