दगडूशेठ हलवाई परिसरात भाविकांची मोठी गर्दी; राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते करण्यात आली आरती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सचा पूर्णत फज्जा उडाला. कोरोना नियमांचं पालन याठिकाणी दिसलं नाही.

    पुणे : गेल्या काहीपासून बंद असणारे राज्यभरातील धार्मिक स्थळं आजपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पहाटे पाच वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दर्शनासाठी गणेशभक्तांनी रांगा लावल्या आहेत.

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सचा पूर्णत फज्जा उडाला. कोरोना नियमांचं पालन याठिकाणी दिसलं नाही कोरोना नियमच उल्लंघन या ठिकाणी झालं भाविक ही दर्शनासाठी येत आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नियमांचे उल्लंघन झालेला आहे.  सर्वांनी नियमांचे पालन करावे असे सांगणारे दत्तात्रय भरणे मात्र नियमांचे उल्लंघन करताना या ठिकाणी पाहायला मिळतात. दगडूशेठ मंदिरावर फुलांची सजावट करण्यात आली आहे.