पूर्व हवेलीतील बड्या ग्रामपंचायतींना मिळणार भरीव निधी

वाघोली:पुणे जिल्हा परिषदेकडून वाघोली ग्रामपंचायतीस मुद्रांक शुल्क महसुलावर आधारित स्वनिधी दिला जाणार असल्याने गाव परिसरातील विकासकामांना वेग येणार आहे.वाघोलीसह लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या निधीबाबतचे आदेशही उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधीत विभागास दिले असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेस मुद्रांक शुल्काद्वारे मोठ्या प्रमाणात महसूल मिळणाऱ्या ग्रामपंचायतींच्या यादीत वाघोली ग्रामपंचायतीचा वरचा क्रमांक लागतो.या पार्वभुमीवर विविधविकासकामांसाठी निधीचा ओघ प्रशासनाकडून ग्रामपंचार्तीना सुरु असतो.वाघोली ग्रामपंचायतीसाठी निधी उपलब्ध व्हावा,यासाठी जिल्हा परिषद सदस्य कटके यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.मुद्रांक शुल्क महसुलावर आधारित स्वनिधी मिळण्याबाबत कटके यांच्याकडून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता.यानुसार जिल्हा परिषदेचे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर याच्याबरोबर विशेष बैठक आज घेण्यात आली.यामध्ये वाघोली गाव परिसरातील विकासकामांबाबत माहिती देण्यात आली.त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदनही कोहिनकर यांना देण्यात आले.

वाघोलीसह लोणीकाळभोर आणि कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीलाही मुद्रांक शुल्क स्वनिधी दिला जाणार असून याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेचे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले.तसेच ग्रामपंचायतंकडे सदर निधी तातडीने वर्ग करण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती कटके यांनी दिली.दरम्यान जिल्हा परिषद तसेच पीएमआरडीएकडून होत असलेल्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला द्वारे वाघोलीसह लगतच्या आठ ते नऊ गावच्या कचऱ्याचे व्यवस्थापन केले जाणार असून यासंदर्भातही यावेकी झालेल्या विशेष बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याचे कटके यांनी सांगितले.यावेळी झालेल्या बैठकीस शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर,कदमवाकवस्तीचे चित्तरंजन गायकवाड,वाघोलीचे माजी उपसरपंच रामकृष्ण सातव पाटील,संदीप सातव पाटील,अनिल सातव पाटील,रोहिणी गोरे,रेश्मा पाचरणे,कविता दळवी,मारुती गाडे,मालती गोगावले,जयश्री काळे,मच्छिंद्र सातव,सुनील जाधवराव,श्रीकांत वाघमारे आदी उपस्थित होते.