बोंड अळी निर्मूलनाचे नियोजन करणे गरजेचे

तालुका कृषी अधिकारी दिपक सुपेकर यांचे मत

कर्जत : कपाशीचे पीक सध्या फुलकळी धरण्याच्या अवस्थेत असून पीक ५० ते ५५ दिवसांचे झाल्यावर फुलावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अगोदरपासूनच बोंड अळी निर्मूलनाचे नियोजन करणे गरजेचे आहे,असे आवाहन कर्जत तालुका कृषी अधिकारी दिपक सुपेकर यांनी केले आहे. कपाशीला फुले येण्यास सुरुवात झाल्यानंतर गुलाबी बोंड अळीची मादी पुलाच्या खालच्या बाजूस अंडी घालते दोन ते तीन दिवसानंतर अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या बोंडात प्रवेश करून बोंडाचे छिद्र बंद करतात. त्यामुळे कपाशीवर बोंड अळीचा झालेला प्रादुर्भाव ओळखता येत नाही. अळीची अवस्था पूर्ण झाल्यानंतर ती कोषावस्थेत जाण्याकरिता बोंडाच्या बाहेर पडते. अशी बोंडे परिपक्व न होताच फुटतात, त्यामुळे कपाशीची प्रत बिघडून कवडीचे प्रमाण वाढते, सरकीचे ही प्रमाण घटते पर्यायाने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होते. आपले नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कपाशीमध्ये प्रतिहेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत, फुलाच्या अवस्थेत दर आठवड्याला मजुराकडून डोमकळ्या शोधून नष्ट कराव्यात निंबोळी अर्काची फवारणी करावी.

 

“कापूस या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे डोमकळ्या दिसू लागताच शेतकऱ्यांनी बोंड आळीचे नियंत्रण करण्यासाठी उपाय योजना करणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेत जर नियंत्रण केले नाही ६० ते ६५ टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते. आमचे सर्व कृषी सहाय्यक कपाशी लागवड गंध साप सगळ्याचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. शेतकऱ्यांंनी कपाशी मध्ये प्रामुख्याने कामगंध सावल्यांचा वापर करावा शेतक्यांना त्यांचा निश्चित फायदा होईल.”

 -प्रविण गंवादे ,उपविभागीय कृषी अधिकारी, कर्जत