नानगाव येथील तरुणावर बिबटयाचा जीवघेणा हल्ला

पारगाव : दौंड व शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबटयाची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये.प्राण्याना भक्ष करणाऱ्या बिबटयाने आता मानवावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.नानगांव ता.दौंड येथील मकबूल हसन मुलानी (वय ३३) या तरुणावर (ता.२३) रोजी रात्री १.०० वाजेच्या सुमारास कामावरुन घरी येत असताना नानगांव व वडगांव रासाई येथील पुलाच्या शेजारील चौकात बिबटयाने हल्ला चढवत गंभीर जखमी केले आहे.

या थरारक घटनेची सविस्तर माहिती मकबूल यांनी दिली ती अशी की,मी नानगांव येथील रहिवाशी असून रंजनगाव MIDC खासगी कंपनीत कामाला आहे.कामाच्या ठिकाणाहून घरी येण्यासाठी हा कमी अंतराचा मार्ग असल्याकारणाने रोज या मार्गावरून माझी ये-जा असते.दुचाकीवरुन रात्री येत असताना समोरून बिबटयाने हल्ला चढवला.अंगात जर्किंग व डोक्यात हेल्मेट असल्याने माझे प्राण वाचले. उजव्या हाताच्या पंज्याला व खांद्याला बिबट्याने चावा घेतला.रक्तबंबाळ अवस्थेत मी माझा प्राण वाचविण्यासाठी वडगाव रासाई या गावाच्या दिशेने धावत सुटलो.’देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणी नुसार त्या सुमारास मागून चारचाकी गाड़ी आल्याने त्यातील व्यक्तीने हॉर्न वाजवून बिबटयास पळवून लावले व मला नानगाव येथे आणून सोडले.घाबरलेल्या अवस्थेत मी गावातील डॉ. माने यांच्याकडे जाऊन प्राथमिक उपचार घेतले आहे.तरी सर्वानी खबरदारी घ्यावी व पिंजरा लावून बिबटया पकडण्यात यावा, अशी मागणी यावेळी मकबूल मुलानी यांनी केली आहे.

यापूर्वी ही पाळीव प्राण्यावर या परिसरात बिबटयाने हल्ले चढवत चांगलाच धुमाकुळ माजवला होता.आता मानवावर बिबटयाने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.वनविभागाने तात्काळ पिंजरा लाउन बिबटयाला जेरबंद करावे अशी मागणी यावेळी ग्रामस्थानी केली आहे.

वडगाव रासाई व नानगाव येथील झालेल्या पुलामुळे दळण-वळण सुलभ झाले आहे.गावातील तरुण मुले कामानिमित्त याच ठिकाणाहून येत असतात.पहाटे व्यायामासाठी सुद्धा येथे लोकांची वरदळ असते त्यामुळे या घटनेने परिसरात घबराहट पसरली आहे.पिंजरा लावून बिबटयाचा बंदोबस्त करण्यात यावा
– विकास खळदकर (युवक अध्यक्ष,राष्ट्रवादी कॉंग्रेस, दौंड)

घटनास्थळी येऊन पाहणी करण्यात आलेली आहे. पिंजरा लावण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येईल

- संजय पावने वनरक्षक,शिरूर

वरवंड येथील वनविभागाच्या अधिकाऱ्याशी बोलणे झाले आहे.शिरूर व दौंड या दोन तालुक्याच्या संयुक्त प्रशासनाच्यावतीने लवकरच बिबटया पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन आम्ही देणार आहोत
– पोपट लव्हे (पोलीस पाटील, नानगाव)