पांगारे (ता.पुरंदर) परीसरात बिबट्याचा धुमाकूळ

नारायणपूर : पांगारे परिसरातील निष्णाई देवी डोंगराच्या खोऱ्यात तसेच हरगुडे परिसरातील नरसोबाच्या डोंगर व मांढर गावच्या परिसरात बिबट्याचा वावर असून निष्णाई डोंगराच्या दुसऱ्या बाजूला मांढर गावचा परिसर आहे .टोणपेवाडी ,शिंदेवाडी या गावातील अनेक शेळ्या व वासरे बिबट्याने हल्ल्यात मारले आहेत.

नारायणपूर : पांगारे परिसरातील निष्णाई देवी डोंगराच्या खोऱ्यात तसेच हरगुडे परिसरातील नरसोबाच्या डोंगर व मांढर गावच्या परिसरात बिबट्याचा वावर असून निष्णाई डोंगराच्या दुसऱ्या बाजूला मांढर गावचा परिसर आहे .टोणपेवाडी ,शिंदेवाडी या गावातील अनेक शेळ्या व वासरे बिबट्याने हल्ल्यात मारले आहेत. पांगारे तसेच पांगारे परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून अनेक गायी वासरे व शेळ्या मेंढ्या फस्त केले आहेत. दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन घडत असल्याने शेतात गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या गुराख्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचे दामोदर काकडे यांनी यावेळी सांगितले .तसेच गणपत गाडे, रामचंद्र शिंदे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे मांढर गावचे माजी सरपंच सचिन शिंदे यांनी सांगितले .पांगारे परिसरात सहा कालवडी व एक खोंड मारला गेला आहे .पांगारे घाटात मेंढपाळांचा घोडा मारला असून घाटात रात्रीच्या वेळी अनेक जणांना या बिबट्याने दर्शन दिले आहे. या घटनांबाबत पांगारे गावचे पोलीस पाटील तानाजी काकडे यांनी वनविभागाला माहिती दिली असून कीर्ती म्हेत्रे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे. त्याच्या हल्ल्यात प्रशांत काकडे, मानसिंग काकडे, बाळासाहेब काकडे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पांगारे परिसरात बिबट्याचा वावर असणारे क्षेत्र मोठे आहे .पाणवठ्यावर पिंजरा लावता येतो पण सर्वत्र पाणी उपलब्ध असल्याने पिंजरा लावायचे ठिकाण निश्चित करणे अवघड जात आहे बिबट्याच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे पंचनामे केले आहेत

-महादेव सस्ते, वनपाल