टाकेवाडी परिसरात बिबट्याचा उपद्रव वाढला

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याची चालढकल मंचर : आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी येथे गेल्या आठ दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या आणि दोन वासरे ठार झाली आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याची चालढकल

मंचर : आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी येथे गेल्या आठ दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या आणि दोन वासरे ठार झाली आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या वतीने िंपजरा लावावा, अशी मागणी करुनही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी टाकेवाडी येथील शेतकरी दत्तात्रय चिखले यांच्या घराशेजारी असलेल्या गोठयात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करुन तिला ठार केले. सोपान बिबवे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करुन ठार केले. दोन्ही शेतकऱ्यांचा पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती उपसरपंच अनिल चिखले व पोलीस पाटील उल्हास चिखले यांनी वनविभागाला कळविली. चिखलेमळा येथे बिबट्याचे नेहमीच दर्शन होत असून रविवार (दि.२१) रोजी बिबट्याने पहाटे चिखले यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करुन ठार केले. गोठयात आवाज झाल्याने चिखले व घरातील सदस्य बाहेर आले असता बिबट्या पळून गेला होता. तेथे बिबट्याच्या पाऊलखुणा आढळुन आल्या आहेत.याबाबत वनअधिकारी  बी.एम.साबळे,के.के.दाभाडे,पोलीस पाटील उल्हास चिखले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.शेतकरी राजाराम शेटे,सयाजी  चिखले यांच्या वासरावर हल्ला करुन ठार केले.मच्छिद्र चिखले,सोपान बिबवे यांच्या शेळ्यांवर हल्ला केला आहे.वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी सरपंच संदीप शिंदे,उपसरपंच अनिल चिखले यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.