खामगावमध्ये बिबट्याची दहशत

नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
दौड: येथील ब्रिटीशकालीन तलाव परीसरामध्ये बिबटयाच्या हल्ल्यात प्रभाकर मारुती म्हेत्रे याच्या गोठ्यातील एक वर्षाच्या वासराचा मृत्यू झाला. दत्तात्रय जाधव यांच्या कोंबड्यावर हल्ला केला. नांदुर परीसरातील गावामध्ये बिबट्याचे दर्शन होत असताना वनविभागाचे कर्मचारी वनपाल गणेश पवार, वनरक्षक पिसाळ यांनी नांदुरचे पोलीस पाटील धोंडीबा थोरात, नेहा बोराटे यांनी पाहणी केली. परिसरात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने शेतात जाणे बंद झाले आहे. परिसरात ऊसशेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्या सापडत नाही. परीसरात बिबट्या सातत्याने दिसत असल्यामुळे बिबट्याला पकड़ण्याची मागणी भानुदास बोराटे, दताञय बोराटे, प्रभाकर बोराटे, दत्तात्रय जाधव, अरूण बोराटे यांनी केली आहे. परीसरातील नागरिकांना बिबट्या रात्री-अपरात्री दिसत असल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परीसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबटया जेरबंद करावा,अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.