जिजामाता उद्यानात जिजाऊ सृष्टी उभारण्यासाठी प्रयत्न करू: आमदार अशोक पवार

शिरूर : येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ सृष्टी उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार अॅड. अशोक पवार यांनी शहरातील शिवभक्तांना दिले.

शिरूर : येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ सृष्टी उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार अॅड. अशोक पवार यांनी शहरातील शिवभक्तांना दिले.        जिजामाता उद्यानात जिजाऊ सृष्टी साकारण्यासाठी  शहर व पंचक्रोशी जयंती उत्सव समिती, आदिशक्ती महिला मंडळ व शहरातील शिवप्रेमी यांनी २०१३ मध्ये नगरपरिषद कडे मागणी केली होती. दोन वर्षापूर्वी नगरपरिषदेने जिजाऊ सृष्टी उभारण्यासंदर्भात ठराव केला होता.यासाठी शिवप्रेमींचा पाठपुरावा सुरु होता.दरम्यान २२ जून ( २०२०)रोजी आमदार पवार फेसबुक लाईव्हवर असताना शिवप्रेमींनी जिजाऊसृष्टीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची विनंती पवार यांना केली होती. यावर पवार यांनी या विषयात लक्ष घालण्याचे सुतोवाच केले होते. यानुसार पवार यांनी जिजामाता उद्यानात जाऊन जागेची पाहणी केली.यावेळी शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारलेल्या जिजाऊसृष्टिच्या संकल्पचित्राची माहिती आमदार पवार यांना अवगत केली.यावर नगरपरिषदेकडून माहिती घेऊन जिजाऊसृष्टि लवकरात लवकर साकारण्यासाठी प्रयत्न करू. असे आश्वासन आमदार पवार यांनी दिले.            पाणीपुरवठा सभापती मुजफ्फर कुरेशी, नगरसेविका मनिषा कालेवार,राष्ट्रवादी कॉग्रेस युवक शहराध्यक्ष रंजन झांबरे,आदिशक्ती महिला मंडळाच्या संस्थापिका शशीकला काळे, अध्यक्षा सुनंदा लंघे, सचिव लता नाझिरकर, सुवर्णा सोनवणे, योगेश फाळके , सागर नरवडे, अजिंक्य महाजन, सागर परभणे, रोहीत सोनवणे, प्रफुल्ल उबाळे, चेतन येलभर आदी यावेळी उपस्थित होते. राजमाता जिजाऊ या अवघ्या मराठी मुलखाच्या माऊली असून महाराष्ट्राची अस्मिता आहे. या माऊलीचे संस्कार, आचार विचार सदैव समाजासाठी प्रेरणादायक ठरणार आहेत. यासाठी लवकरात लवकर येथे जिजाऊसृष्टी साकारली जावी अशी तमाम शिवप्रेमींची इच्छा असल्याची भावना कुणाल काळे याने व्यक्त केली.