उंच झाडावर अडकलेल्या मोरास तरुणांकडून जीवदान

कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाण येथे मागील ४ वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या व सुमारे २५ फूट उंच झाडावर फाद्यांमध्ये पाय अडकलेल्या राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरास २ तरुणांनी

कवठे येमाई :  शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाण येथे मागील ४ वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या व सुमारे २५ फूट उंच झाडावर फाद्यांमध्ये पाय अडकलेल्या राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरास २ तरुणांनी जीवाची पर्वा न करता त्या झाडावर चढून या अडकलेल्या मोरास सहीसलामत खाली घेत जीवदान दिले. या तरुणांचे सरपंच अरुण मुंजाळ व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. 
       मागील सुमारे ४ वर्षांपासून कवठे येमाई गावठाणात एक मोर वास्तव्यास आहे. हा मोर दररोज सकाळपासून गावात विविध भागात फिरून सायंकाळी मारुती मंदिरा लागत असणाऱ्या उंच झाडावर वास्तव्यास असतो.त्यास अत्यवश्यक असणारे खाद्य त्याला परिसरात मिळत असल्याने गावकरी ही त्या मोरास जीवापाड प्रेम देत आहेत. आज दि. २८ ला सकाळी ७ च्या दरम्यान त्या झाडावर फाद्यांमध्ये उपाय अडकलेल्या मोराची तडफड व आवाज ऐकू आल्याने व कावळे त्या ठिकाणी घिरट्या घालत असल्याचे पाहून नजीकच्या २ तरुणांनी झाडावर पाय अडकलेल्या मोरास सहीसलामत खाली घेतले. तात्त्काळ त्या जखमी मोरास येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले.पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याच्या पायावर पट्ट्या लावून उपचार करण्यात आले असून त्यास गावातील एका विशेष ठिकाणी ठेवण्यात आले आहे. या बाबत शिरूर वन विभागास कळविण्यात आले असून आगामी ३/४ दिवसात मोर व्यवस्थित चालू लागला तर त्यास पुन्हा गावात मुक्त संचार करण्यासाठी सोडा अन्यथा पायाची जखम गंभीर वाटल्यास त्यास कात्रज पुणे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात येईल अशी ग्वाही वन अधिकारी मनोहर म्हसकर यांनी दिली