पुण्यात २३ जुलैपासून होणार लॉकडाऊन? जिल्हाधिकारी नवलकिशोर यांनी दिली माहिती

  • पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणाले कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लवकरच नियंत्रण मिळवण्यात येईल. परंतु पिंपरी आणि ग्रामीण भागात परिस्थिती आटोक्यात आणायला वेळ लागेल. कोरोना रुग्णांसाठी बेडची आणि ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड जास्तीत जास्त वाढवण्याच्या उपाययोजना करत आहोत. पुण्यातील कोरोनाचा मृत्यू दर कमी झाला आहे.

पुणे – पुण्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे पुण्यात उपमुख्यमंत्री व पुणे पालकमंत्री अजित पवार यांनी बैठक धेत पुणे आणि पिंपरीत १३ ते २३ जुलैपर्यत लॉकडाऊन घोषित केला आहे. परंतु आता हा लॉकडाऊन काळ संपत आलेला आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाऊन वाढणार का अशी कुरभूर पुण्यातील जनतेत आहे. त्याला पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी प्रतिक्रिया देत पुर्णविराम दिला आहे. पुण्यात २३ जुलै नंतर लॉकडाऊन करणार नसल्याचे वक्तव्य जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणाले कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लवकरच नियंत्रण मिळवण्यात येईल. परंतु पिंपरी आणि ग्रामीण भागात परिस्थिती आटोक्यात आणायला वेळ लागेल. कोरोना रुग्णांसाठी बेडची आणि ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड जास्तीत जास्त वाढवण्याच्या उपाययोजना करत आहोत. पुण्यातील कोरोनाचा मृत्यू दर कमी झाला आहे. 

पुढे जिल्हाधिकारी म्हणाले की, पुण्यातील इंडस्ट्री औद्योगिक कंपन्यांचे कार्यकाल चालुच आहे. तसेच त्यातून कोणतीही तक्रार आलेली नाही. प्रतिबंधित क्षेत्रात काही अटी कठोर करण्यात येतील. तसेच पुणे जिल्ह्यातील कोरोनामुळे लॉकडाऊन वाढविण्यात येईल अशी कोणतीही परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेत आहोत. कोरोनावर लॉकडाऊन हा एक उपाय नाही आहे, परंतु नागरिकांना सूचनांचे पालन करावे लागेल. पुण्यात २३ जुलै नंतर लॉकडाऊन वाढविला जाणार नाही असे सूचक वाक्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नवलकिशोर यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.