२६३ थिल्लर पर्यटकांवर लोणावळा पोलिसांची कारवाई ; तब्बल १ लाख ३ हजाराचा दंड केला वसूल

पर्यटक पोलिसांना खोटे कारण सांगून पर्यटन स्थळांवर जात आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलीसांनीही पर्यटकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

    पिंपरी: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाला मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटक लोणावळ्यातील अनेक ठिकाणे व भूशी डॅमवर गर्दी करताना दिसून येत आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असून पर्यटनाला बाहेर पडलेल्या नागरिकांना पोलीस माघारी पाठवत आहेत. शनिवारी २६३ नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत १ लाख २३ हजारांचा दंड वसूल केला.

    जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, पोलिसांना अशा ठिकाणी लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही शनिवार, रविवारी नागरिकांनी लोणावळ्यातील भुशी डॅम आणि इतर ठिकाणांवर पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

    पुणे, पिंपरी – चिंचवड आणि मुंबई वरुन नागरिक या ठिकाणावर येत आहेत. प्रामुख्याने भुशी डॅम, लायन पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणांवर पर्यटकांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. पर्यटक पोलिसांना खोटे कारण सांगून पर्यटन स्थळांवर जात आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलीसांनीही पर्यटकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी २६३ नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत १ लाख २३ हजाराचा दंड वसूल केला.