लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडीत बिघाडी?

लोणी काळभोर : शिवसेना,राष्ट्रवादी,कॉग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात एकत्रित नांदत असले तरी गावपातळीवरील ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र आघाडीत बिघाडी असल्याचे चित्र सध्या लोणी काळभोरमध्ये दिसत आहे.

लोणी काळभोर : शिवसेना,राष्ट्रवादी,कॉग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात एकत्रित नांदत असले तरी गावपातळीवरील ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र आघाडीत बिघाडी असल्याचे चित्र सध्या लोणी काळभोरमध्ये दिसत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भावकी गावकीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुर्व हवेलीमधील लोणी काळभोर या मोठ्या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर या दोन मातब्बर नेत्यांनी एकमेकाविरोधात कंबर कसली आहे.

लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर, गावातील राजकिय हालचालींना मागील काही दिवसांपासून वेग आला आहे.शिवसेनेच्या माध्यमातून प्रशांत काळभोर यांनी सतरा जागेसाठी उमेदवारांची जय्यत तयारी सुरु केली असून तर दुसरीकडे प्रशांत काळभोर यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे हवेली पंचायत समितीचे विद्यमान सदस्य व माजी उपसभापती सनी काळभोर यांनी जेष्ठ नेते व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, माजी जिल्हा परीषद सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, साधना सहकारी बॅकेचे जेष्ठ संचालक सुभाष काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाहेब काळभोर, शिवदास काळभोर, माजी उपसरपंच योगेश काळभोर आदी मात्तबर नेत्यांना एकत्र करत पॅनेलची चाचपणी सुरु केली आहे.

लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी,भाजप कॉग्रेस असे एकत्रित पॅनल करून शिवसेनेविरोधात दंड थोपटणार अशी व्युहरचना आखली आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मात्र गावपातळीवर आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.