राणे कुटुंबियांच्या अडचणी वाढणार; नीलम राणे यांच्यासह नितेश राणे यांच्याविरोधात लुकआउट नोटीस

भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लुकआउट नोटीस जारी केली आहे.

    पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची पत्नी आणि मुलगा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याविरोधात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लुकआउट नोटीस जारी केली आहे. वेगवेगळ्या कंपन्यांकडून घेतलेले 65 कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याप्रकरणी ही नोटीस पाठवली आहे, असे सांगण्यात आले आहे.

    दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी व आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रा. लि. या कंपनीने 25 कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं. तर नीलम राणे (Neelam Rane) या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रा. लि.च्या अर्जदार होत्या. तसेच नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने डीएचएफएलकडून 40 कोटीचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची देखील परतफेड केली नव्हती. या कर्जाची परतफेड न केल्याने याबाबत संबंधित कंपनीने त्यांच्याविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार दाखल केली होती. ती तक्रार राज्य सरकारकडे आली.

    राज्य सरकारने ही तक्रार पुणे पोलिसांकडे पाठवली. त्यानुसार हे प्रकरण गुन्हे शाखेकडे आले आहे. त्यानुसार गुन्हे शाखेने लुकआउट नोटीस जारी केली आहे. 3 सप्टेंबर रोजी ही नोटीस पाठवली आहे.