खाजगी हाॅस्पिटलकडून लूट ;कोविड काळात खाजगी हाॅस्पीटलचा झाला पैसे कमविण्याचा धंदा ; कोविड रूग्णांस दिले जात आहे १४ दिवसाचे आठ लाखाचे बील

रूग्णाला आधार, धीर, लक्ष दिले, खाऊपिऊ घातलेतरच रूग्ण बरा होऊ शकतो परंतु त्यास काहीच दिले जात नसले, लक्ष दिले नाहीतर रूग्णांची खाण्यापिण्यावाचून हालत बिघडून रूग्ण आयसीयूमध्ये, व्हेटिलेटरवर जातो, असा प्रकार सर्रास घडत आहेत. रूग्णालयात चालत आलेला रुग्ण अनेकदा असा प्रकाराने दगावलेले आहे, असा प्रकार येरवडा भागातील शास्त्रीनगर येथील एका नामांकित खाजगी हाॅस्पिटलमध्ये घडला आहे. डाॅक्टर म्हणतात आम्ही रोज चांगला उपचार करीत आहोत, सर्व प्रकारचे उपचार केलेले आहे.

  वसंत वाघमारे , हडपसर : कोरोना महामारी व्हायरस आजारामुळे सर्व त्रस्त झाले असून कोविड महामारीत राज्य शासन, प्रशासन हातबल झाले आहे. अनेक गोरगरीब रूग्णांनाा आॅक्सिजन, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नसल्याने प्राणास मुकावे लागत आहे. वाढती रूग्ण संख्या पहाता सरकारी हाॅस्पिटल ही अपुरे पडत आहेत.

  जीव वाचवण्यासाठी नाईलाजास्तव नागरिक खाजगी हाॅस्पिटलची वाट धरतात, परंतु गेले वर्षभरापासून कोविड रोगावर कुठलेही प्रभावी औषध निघालेले नसताना, तेंव्हा लस ही नव्हती तरी देखील कोविड काळात खाजगी हाॅस्पिटल लाखो रूपयांचे बील आकारून कोविड रूग्णांंची लूट करीत आहेत.
  अनेकजण आपल्या प्रिय व्यक्तीचा उपचारात कमतरता पडू नये म्हणून नामांकित खाजगी हाॅस्पिटल अॅडमिट करतात, तिथे सोयीसुविधा, स्वच्छता असते व आॅक्सिजन बेड मिळाला म्हणून फक्त रूग्णांला व नातेवाईकांच्या मनाला समाधान वाटते, सहा सात दिवसाचे उपचाराचे बील लाखोंच्या घरात दिले जाते, रूग्ण घरी येईल का नाही,याची कोणतीही शाश्वती नाही, अनेक खाजगी हाॅस्पिटलकडे तज्ञ डाॅक्टरांची कमतरता आहे.

  -कोविड रुग्णांकडे लक्ष देत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले?
  खाजगी हाॅस्पिटलमध्ये ही कोविड रूग्णांकडे लक्ष दिले जात नसल्याच्या तक्रारी येत आहे. पुण्यातील येरवडा भागातील खाजगी हाॅस्पिटल मध्ये कोविड रूग्णांस हाॅस्पिटलमध्ये भरती केले असता रूग्णांची हेळसांड होत आहे. आतमध्ये काय उपचार चाललेत रुग्ण खातोपितो का याची माहिती नातेवाईकांना नसते, कि आत मध्ये बघायला सोडले जात नाही, की रुग्णांला दाखवित नाही, रूग्णांस नातेवाईक खाण्यास फळे, ज्युस, डब्बा दूरून देतो परंतु रूग्णास प्रत्यक्षात खाण्यास मिळत नाही. पाणी सुध्दा वेळेत देत नाही डबा कचरा पेटीत जात असल्याचे खाजगी हाॅस्पीटलमध्ये काम करणारे स्टाफ नाव न सांगण्याच्या अटीवर सांगत आहेत.

  -वाढीव बील देणाऱ्या हाॅस्पिटलवर कारवाई करावी
  रूग्णाला आधार, धीर, लक्ष दिले, खाऊपिऊ घातलेतरच रूग्ण बरा होऊ शकतो परंतु त्यास काहीच दिले जात नसले, लक्ष दिले नाहीतर रूग्णांची खाण्यापिण्यावाचून हालत बिघडून रूग्ण आयसीयूमध्ये, व्हेटिलेटरवर जातो, असा प्रकार सर्रास घडत आहेत. रूग्णालयात चालत आलेला रुग्ण अनेकदा असा प्रकाराने दगावलेले आहे, असा प्रकार येरवडा भागातील शास्त्रीनगर येथील एका नामांकित खाजगी हाॅस्पिटलमध्ये घडला आहे. डाॅक्टर म्हणतात आम्ही रोज चांगला उपचार करीत आहोत, सर्व प्रकारचे उपचार केलेले आहे. औषधे दिली आहे,खाणे पिणे देतो, आमच्याकडे सर्व इन कॅमेरात चालू आहे. प्रत्यक्षात जेंव्हा आत मध्ये रुग्णांला भेटले असता आतले चित्र मात्र वेगळेच असते, पेशंट हाताने हातवारे करून सांगतो मला जेवण दिले नाही, पाणी नाही, आमच्याकडे लक्ष देत नाही, तोंडाला आॅक्सिजन लावून ठेवल्याल्याने काहीच बोलता येत नाही शेवटी रुग्णांला कमजोर करून, हलगर्जी पणा करून असह्या करून सोडले जाते. शेवटी रुग्णांला जगाचा निरोप घ्यावा लागतो, आणि डाॅक्टर म्हणतात आम्ही काय रूग्ण मारण्यासाठी हाॅस्पिटल चालवितो का, शेवटपर्यंत आमचा जीव वाचविण्याच प्रयत्न असतो. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. सर्वच हाॅस्पिटल असे करतात असे नाही. काही हाॅस्पिटलचा कोविड काळात पैसे कमविण्याचा धंदाच सुरू केला आहे. शासनाने खाजगी हाॅस्पिटलच्या कोविड रुग्णांचे बीलाकडे लक्ष देवून वाढीव बील देणाऱ्या हाॅस्पिटलवर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.