इंदापूर आगाराला साडेपाच लाखांचा तोटा

इंदापूर : कोरोना व त्या पाठोपाठ सुरु झालेल्या प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे इंदापूर एसटी आगाराला साडेपाच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. हा तोटा भरुन काढण्यासाठी मध्य लांब पल्ला व लांब पल्ल्यांच्या सर्व फे-या सुरु करण्यासह आवश्यकतेनूसार टप्प्या टप्प्याने ग्रामीण भागातील फे-या वाढविण्याचा निर्णय इंदापूर आगाराने घेतला आहे.

लांब पल्ल्याची सेवा सुरू करणार : आवश्यकतेनूसार ग्रामीण भागातील फेऱ्या वाढविणार
इंदापूर : कोरोना व त्या पाठोपाठ सुरु झालेल्या प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे इंदापूर एसटी आगाराला साडेपाच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. हा तोटा भरुन काढण्यासाठी मध्य लांब पल्ला व लांब पल्ल्यांच्या सर्व फे-या सुरु करण्यासह आवश्यकतेनूसार टप्प्या टप्प्याने ग्रामीण भागातील फे-या वाढविण्याचा निर्णय इंदापूर आगाराने घेतला आहे.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना  म्हणाले,  दि.२३ मार्चपासून कोरोनाची साथ व लॉकडाउनमुळे एसटी वाहतूक पूर्णतः बंद होती. लॉकडाउनचा फटका बसून इंदापूर आगाराचे दैनंदिन सरासरी उत्पन्न साडेपाच लाख रुपयांनी घटले. याआधी आगाराचे सरासरी दैनंदिन उत्पन्न सात लाख रुपये होते. सध्या ते दीड लाख रुपयांवर आले आहे, असे त्यांनी सांगितले.उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून प्रवाशांच्या सेवेसाठी सध्या इंदापूर आगारामार्फत बारामती, अकलूजसाठी दर अर्ध्या तासाने एक फेरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वीच्या दर ४५ मिनिटाला एक फेरी होत होती, अशी माहिती मणेर यांनी दिली.

गर्दीनुसार आवश्यक त्या फे-या चालू करायचे आपले नियोजन आहे.सांगली, कोल्हापूर, सातारा या सर्व प्रकारच्या मध्यम लांब पल्ला व लांब पल्ल्याच्या सर्व फेऱ्या चालू करण्यात आल्या आहेत.

- मेहबूब मणेर, आगार व्यवस्थापक