गोपीचंद पडळकरांवर वादग्रस्त वक्तव्यामुळे होणार कारवाई

पुणे - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने हा मुद्दा चांगलाच धारेवर धरला आहे. गोपीचंद पडळकरांनी शरद पवार हे माहाराष्ट्राला

 पुणे – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने हा मुद्दा चांगलाच धारेवर धरला आहे. गोपीचंद पडळकरांनी शरद पवार हे माहाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. असे वक्तव्या पत्रकार परिषदेत केले आहे. याचाच राष्ट्रवादीने तीव्र शब्दात निषेध केला आहे. पडळकरांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले जात आहे. असे गृहराज्यमंत्री शूंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. 

शंभूराज देसाई म्हणाले की, पडळकरांची भाषणाची व्हिडिओ पोलिसांना देण्यात आली आहे. पडताळणीत काही वादग्रस्त दिसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 

गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. नेहमीप्रमाणे भाजपाने या प्रकरणातही काढता पाय घेतला आहे. पडळकरांचे वैयक्तिक मत आहे असे स्पष्टिकरण देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. या विरोधात राष्ट्रवादी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.