एमपीएससीतून परीक्षा उत्तीर्ण होऊन वर्ष लोटले तरी नियुक्त्या न मिळालेल्या उमेदवारांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोटांगण आंदोलन

शासन राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या संदर्भात आढावा घेत असताना आमच्या ४१३ उमेदवाराच्या नियुक्तीचा सरकारला विसर पडला का ? असा प्रश्न आज महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. आता  शासनाने अजून १४ दिवस मागितले आहेत. मग गेल्या वर्षभरापासून नियुक्तीचा सरकारला विसर पडला होता का? असा सवाल विद्यार्थ्यांकडून व्यक्त केला जात आहे जात आहे.

    पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन वर्ष उलटले तरी नियुक्त्या न मिळालेल्या हाताश उमेदवारांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोटांगण आंदोलन केले. आयोगाकडून राज्यसेवा २०१९ च्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर होऊन  एक वर्ष झाले. मात्र यामध्ये यशस्वी झालेल्या ४१३ विद्यार्थ्यां नियुक्या मिळालेल्या नाहीत.
    परीक्षेच्या निकालानंतर सुरुवातीला कोरोनाचे देत नियुक्त्या लांबवण्यात आल्या त्यानंतर SEBC आरक्षण यांचे कारण सांगण्यात आले. पण ५ मे चा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन दीड महिने झाले तरी शासनाने नियुक्तीचा विषय अजूनही प्रलंबित ठेवला आहे. .