प्रेयसीने फसवल्याने प्रियकराची आत्महत्या

पुणे : प्रेमाचे नाटक करुन तरुणी व तिच्या आईने या तरुणाला चांगलेच लुबाडले. त्यांना देण्यासाठी त्या तरुणाने दुसर्‍यांकडून उसने पैसे घेतले. पैसे घेतल्यानंतर त्या दोघींनी त्याचा विश्वासघात केला.

पुणे : प्रेमाचे नाटक करुन तरुणी व तिच्या आईने या तरुणाला चांगलेच लुबाडले. त्यांना देण्यासाठी त्या तरुणाने दुसर्‍यांकडून उसने पैसे घेतले. पैसे घेतल्यानंतर त्या दोघींनी त्याचा विश्वासघात केला. दुसरीकडे ज्याने उसने पैसे दिले होते, तो आता ते पैसे परत मागू लागला. या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकाश पोपट पवार (वय ३०, रा. बिदरवाडी, ता. खेड , जि़. पुणे ) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आईच्या फिर्यादीवरुन चाकण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पूजा दशरथ पवार , तारा दशरथ पवार (दोघी रा़ चाकण), सनी वडाने (रा. खेड ) आणि गणेश बळीराम शिंदे (रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावेआहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश पवार याच्याबरोबर पूजा पवार हिने प्रेमाचे नाटक केले. त्याला फसवून त्याच्याकडून वेळोवेळी पैसे घेऊन त्याला लुबाडले. तारा पवार आणि सनी वडाने यांनी तिला मदत केली. तिला पैसे देण्यासाठी प्रकाश पवार याने गणेश शिंदे याच्याकडून उसने पैसे घेतले होते. वारंवार पैसे घेतल्यानंतर तिने प्रकाशचा विश्वासघात केला. त्याचवेळी उसने घेतलेले पैसे परत करण्याची गणेश शिंदे वारंवार मागणी करु लागला. त्यामुळे मानसिक त्रास होऊन प्रकाश पवार याने खेड तालुक्यातील रोहकल येथील रामू गोरे यांच्या आंब्याच्या वनात जाऊन १६ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकाश पवार याला आत्महत्येस प्रवृत्तकेल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.