नाझरे धरणक्षेत्रात कमी पाऊस, धरणाची पाणी पातळी घटली

नाझरे धरणातील पाणी पातळी गेल्या २५ दिवसांपासून स्थिर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या धरणात २४ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी ऑगस्ट २०२० नाझरे धरण शंभर टक्के भरले होते.

    पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात पावसाने विसावा घेतल्यामुळे नाझरे धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. नाझरे धरणातील पाणी पातळी गेल्या २५ दिवसांपासून स्थिर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या धरणात २४ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी ऑगस्ट २०२० नाझरे धरण शंभर टक्के भरले होते. यंदा मात्र केवळ २४ टक्क्यांच्या आतबाहेर येऊन जवळपास पंचवीस दिवसापासून स्थिरावले आहे.

    सलग तीन वर्ष ऑगस्ट महिन्यात नाझरे धरण शंभर टक्के भरत होते. मात्र यंदा धरण लाभक्षेत्रात पाऊस कमी प्रमाणात झाल्याने व महिन्याभरापासून थांबल्याने नाझरे धरणाची पाणीपातळी वाढण्याऐवजी घटली आहे. नाझरेवर अवलंबून असलेल्या पुरंदर-बारामती तालुक्यातील शेतकरी, नागरिक तसंच औद्योगिक वसाहतींचं लक्ष धरण पूर्णतः भरणार का आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार का? याकडे लागलं आहे.