लेफ्टनंट कर्नल लष्कर अधिकारी महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

रश्मी या कर्नल असून, त्यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. त्या जयपूर येथे आर्मी इंटेलिजन्स मधे मूळ पोस्टिंगला आहेत. पुण्यातील आर्मी ट्रेनिंग स्कूल मध्ये ६ महिन्याचे ट्रेनिंग घेण्यासाठी त्या आल्या होत्या.

    पुणे : शहरातील वानवडी परिसरात एका लेफ्टनंट कर्नल लष्कर अधिकारी महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. रश्मी मिश्रा (वय ४३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

    रश्मी या कर्नल असून, त्यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. त्या जयपूर येथे आर्मी इंटेलिजन्स मधे मूळ पोस्टिंगला आहेत. पुण्यातील आर्मी ट्रेनिंग स्कूल मध्ये ६ महिन्याचे ट्रेनिंग घेण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यातील ३ महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले आहे. त्यांचे पती देखील कर्नल आहेत. त्यातच त्यांनी आत्महत्या केली आहे. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.