महामोर्चाला परवानगी नाकारली ; सघंटना आणि पक्ष कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन

पुणे : कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पुण्यात महाविकास आघाडी, सर्व शेतकरी, कामगार संघटनांसह माकप, भाकप, लोकायतसह शिख बांधवांच्या नियोजित महामोर्चाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली.त्यामुळे उपस्थित नेते व कार्यकर्त्यांनी टिळक चौकात ठिय्या आंदोलन केले. देशव्यापी बंद मध्ये बाजार घटक सहभागी झाल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आवारातील उलाढाल ठप्प झाली होती.

दिसकाळी अकरा वाजता अलका चौकात सर्व शेतकरी, कामगार संघटना, माकप, भाकप आणि महाविकास आघाडीचे घटकपक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, कार्यकर्ते संयुक्त महामोर्चा काढण्याच्या तयारीत होते. झेंडे, घोषणा फलक, साऊंड सिस्टिम घेऊन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत लक्ष्मी रस्त्यावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. आंदोलनकर्ते नेत्यांना महामोर्चाला परवानगी नाकारली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर संतप्त नेते व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यामध्ये शहरातील विविध गुरूद्वारांमधून आलेले शीख बंधु-भगिनी देखील झेंडे घेऊन सामील झाले.

‘शेतकरी कामगार एकजुटीचा विजय असो, लई झाली मोदी विकासावर चर्चा, नाही केली स्वामिनाथन आयोगावर चर्चा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी झेंडे, माझा शेतकरी माझा पाठिंबा, शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत हल्लाबोल केला. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी त्यानंतर मोर्चा रद्द करून भर उन्हात ठिय्या आंदोलन केले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची भाषणे झाली. गर्दीमुळे वाहतुक संथ गतीने सुरू होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू होती.

दरम्यान, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवारातील उलाढाल ठप्प झाली होती .हमाल पंचायत ,श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, आडते असोसिएशन तसेच किराणा भुसार बाजारातील दि पूना मर्चंट चेंबर्स या संघटनांनी देशव्यापी बंदला पाठिंबा दिला होता .यामुळे आज बाजार शंभर टक्के बंद ठेवण्यात आला होता.