आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही स्वबळावर? : राज ठाकरेंनी दिले संकेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात नवीन पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत.

    पुणे : या कार्यालयातून निवडणुकीच्या तयारीची सुरुवात झाली का? तर हो झाली. आगामी निवडणुकांमध्ये  मनसेचे वातावरण चांगलेच असेल. सध्या माझे इंजिन मीच चालवतोय. निवडणुकांमध्ये परिस्थितीनुसार एकला चलो रे अशी भूमिका राहील, असे राज ठाकरे म्हणाले अश्या शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात नवीन पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत.

    फक्त माथी भडकवायची आहेत का?

    यावेळी आरक्षणाच्या मुद्यावरही त्यानी खास शैलीत भाष्य केले. ते म्हणाले की,  मराठा आरक्षणाचा मुंबईला मोर्चा निघाला त्यावेळी सगळेच नेते गेले होते. त्यावेळी सगळ्यांना मान्य होते तर मग अडले कुठे?. केंद्राच्या सरकारला मान्य आहे राज्य सरकारला मान्य आहे. मग अडवलय कुणी? कोर्टात व्यवस्थित मांडल जात नाही का?  फक्त माथी भडकवायची आहेत का?

    आता समाजाने विचारले पाहिजे

    राज ठाकरे म्हणाले की, सगळ्यांना एका व्यासपीठावर बसवा आणि विचारा. कोण कुणाचा शत्रू आहे हेच कळत नाही. समाजाचे प्रश्न आले की तोंड फिरवायचे. आता समाजाने विचारले पाहिजे. आरक्षण प्रकरणी राजकारण आहे का हे समाजाने बघितले पाहिजे, अशी भुमिकाही राज ठाकरे यांनी मांडली.